🌟जिल्ह्यातील ११ तालुक्यातील व्यवहार ठप्प🌟
बिड :- बिड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्याकांड प्रकरणाचे फोटो, व्हिडीओ व्हॉयरल झाल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र तीव्र संतापाची लाट उसळली आहे. बीड जिल्ह्यात आज बुधवार दि.०४ मार्च रोजी अचानक स्वयंस्फुर्त कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमुळे जिल्ह्यातील ११ तालुक्यातील व्यवहार ठप्प झाले होते. माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा आ.धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सहआरोपी करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ सोमवारी प्रसार माध्यमांनी प्रसारीत केल्यानंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. ११ तालुक्यांमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. तर काही ठिकाणी बंदल हिंसक वळण लागलं. केजमध्ये नागरिकांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना भरचौकात फाशी देण्यात यावी. धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सहआरोपी करावे अशी आक्रमक मागणी आंदोलकांनी केली. बीड जिल्ह्यात रात्रीपासूनच संताप व्यक्त केला जात आहे. सोमवारी रात्रीच जिल्हा बंदची हाक देण्यात आली. या संपूर्ण हत्येचा निषेध व्यक्त करण्यासाठी केजमध्ये धारूर चौकात कार्यकर्त्यांनी टायर पेटवले. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी केली. हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. संतापाची लाट उसळली आहे. या हत्येच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीसह हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी जोर धरत आहे. हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी घ्या, अशी मागणी करण्यात आली. लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतप्त मराठा समाजातील तरुणांनी धनंजय मुंडे आणि आरोपींचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला. तर यावेळी धनंजय मुंडे आणि आरोपींविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.......
0 टिप्पण्या