🌟पुर्णा नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभारा विरोधात वंचित बहुजन आघाडीचे १९ मार्च रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन🌟
पुर्णा :- पुर्णा शहरातील पाणी पुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून खंडित झाला आहे त्याला सर्वस्वी पुर्णा नगर परिषद प्रशासन जबाबदार आहे शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी आलेला निधी स्वतःच्या खिशात घालण्याकरिता नगर परिषद मुख्याधिकारी व पाणी पुरवठा अभियंता हे कृत्रिम अडचणी निर्माण करून स्वतःचे खिसे भरण्याचे काम करीत आहेत या नगर परिषद प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचा फटका सर्व शहरातील नागरिकांना बसत आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील रस्ता व सुशोभीकरण हे भीम जयंतीच्या अगोदर करण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गेल्या सहा महिन्यांपासून नगर परिषद कार्यालय पूर्णा यांना निवेदने देऊन प्रत्यक्ष मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती केली
आतापर्यंत नगर परिषद प्रशासनाने वेळ काढू उत्तरे देऊन ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. सद्या रमजान महिना चालू आहे मुस्लिम बांधवांचे रोजे चालू आहेत पण या हलकट नगर पालिका प्रशासनाला पाणी पुरवठा खंडित असल्याची लाज वाटत नाही या करिता येणाऱ्या १९ मार्च २०२५ बुधवार रोजी नगर परिषद कार्यालय पुर्णा च्या पुढे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असून वंचित बहुजन आघाडीने नगर परिषद प्रशासनाकडे खालील मागण्या खालील केलेल्या आहेत :-
१. पाणी पुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा.
२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून कुरेशी मोहल्ला असा रस्ता १४ एप्रिल म्हणजे भीम जयंतीच्या आत करण्यात यावा.
३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सुशोभीकरण भीम जयंतीच्या अगोदर करण्यात यावे.
४. सर्व नंबर १५८ मधील नामांतर कुटुंबातील वारसांच्या नावे करण्यात यावे.
५. विकास कामांसाठी आलेला निधी बोगस कामे करून स्वतःच्या खिशात घालणाऱ्या पालिका प्रशासन व गुत्तेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
आदी मागण्या करण्यात आल्या असून सदरील धरणे आंदोलन करण्या संधर्भात नियोजन करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज शनिवार दि.१५ मार्च २०२५ सायंकाळी ०७:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह आंबेडकर नगर पूर्णा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे पुर्णा तालुका पदाधिकारी यांनी दुपारी ०१:०० वाजता महामानव मल्टीसर्व्हिसेस तहसील कार्यालया समोर पूर्णा येथे उपस्थित राहावे या बैठकीस उपस्थित राहून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनास पाठिंबा द्यावा व धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी जिल्हा तालुका व शहर शाखा पुरणाच्या वतीने वंचित बहुजन आघाडी परभणी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे यांनी केले आहे......
0 टिप्पण्या