🌟पुर्णेतील सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान शेख बाबू यांच्या दोन चिमुकल्या सुपुत्रांनी केला पवित्र रमजान महिन्यातील पहिला रोजा.....!


🌟शेख नोमान वय १० वर्ष व शेख दानिश वय ०८ वर्ष या दोन चिमुकल्यांनी ठेवला आपल्या जिवनातील पहिला रोजा🌟

पुर्णा :- पुर्णेतील सामाजिक कार्यकर्ते तथा इकबाल नगर येथील रहिवासी शेख इरफान शेख बाबू याचे दोन चिरंजीव शेख नोमान शेख इरफान वय १० वर्षे व शेख दानिश शेख इरफान वय ०८ वर्षे या दोन चिमुकल्यांनी मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यातील आपल्या जिंवनातला पहिला रोजा ठेवून मुस्लिम समाजाच्या महत्त्वपुर्ण फर्ज (कर्तव्य) अगदी कमी वयात पुर्ण केले त्यांच्या या कर्तृत्वाचे त्यांच्या कुटुंबातील आई-वडील,आजी-आजोबा,काका-काकू आदींसह नातेवाईक तसेच चाहत्यांकडून कौतुक होत आहे.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या