🌟ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी सौ.साकोरे यांचे ठिकठिकाणी स्वागत केले🌟
परभणी (दि.१३ मार्च २०२५) : परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज गुरुवार दि.१३ मार्च रोजी होळी सनानिमित्त स्वतःच्या मतदारसंघांतर्गत आडगाव सर्कल मधील विविध तांड्यांना भेटी दिल्या तेथील महिलांसोबत होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
बंजारा समाजाच्या पारंपारिक वेशभूषेत पालकमंत्री सौ.मेघनाताई साकोरे यांनी आडगाव तांडा,इटोली तांडा,गणेशनगर तांडा,सावळी तांडा इत्यादी तांड्यांना भेटी दिल्या होळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. विशेषतः महिलांबरोबर होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. पालकमंत्री सौ. साकोरे यांच्या या उपस्थितीने त्या त्या तांड्यावरील होळी जल्लोषात साजरी झाली. ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी सौ.साकोरे यांचे ठिकठिकाणी स्वागत केले सहभागाबद्दल कौतूक केले.....
0 टिप्पण्या