🌟काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रतिपादन🌟
✍️ मोहन चौकेकर
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरी मशीदीची पुनरावृत्ती होईल असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानं दिला आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विश्व हिंदू परीषद आणि बजरंग दल यांनी स्टंट करु नये असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
💫औरंगजेबाची कबर शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष ?
औरंगजेब जेवढा क्रूर होता तेवढ्याच क्रूरपणे महाराष्ट्रातील फडणवीस सरकार वागत असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. घाशीराम कोतवालप्रमाणे गृहविभाग चालतोय का? असा प्रश्न पडतो. औरंगजेबाची कबर म्हणजे विरत्वाची कबर नाही तर ती कबर क्रूरपणाची आहे. त्यामुळं ती कबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देखील आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या औरंगजेबाच्या कबरीपुढं पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
💫नेमकं प्रकरण काय ?
विधानसभेत गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले आहे. अबू आझमींच्या वक्तव्यानंतर औरंगजेबाची कबर काढून टाका या मागणीसाठी आता विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलही आक्रमक झालाय. औसंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल असे म्हणत या दोन्ही संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यभर एकाच दिवशी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन होणार असून सकरकारने कबरीबाबत निर्णय घेतला नाही तर मात्र आम्ळी बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करत ती कबर हटवू अशा इशारा बजरंग दलाने पुण्यात दिला आहे. शिवजयंती म्हणजेच 17 मार्च रोजी विश्व हिंदू परिषद राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कबर हटवा या मागणीसाठी आंदोलन करणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यादिवशी निवेदन देखील देण्यात येणार आहे.. राज्यभर एकाच दिवशी एकाच वेळी हे आंदोलन होणार असून जर या आंदोलनानंतर सरकारने या कबरी बाबत निर्णय नाही घेतला तर मात्र आम्ही बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करत ती कबर हटवू असा इशारा बजरंग दलाने पुण्यात दिला आहे.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या