🌟महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणातून अटक...!


🌟प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची देखील धमकी दिली होती🌟

मुंबई :- महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा वादग्रस्त प्रशांत कोरटकर हा महिन्या भरापासून फरारी होता कोल्हापूर पोलिस त्याचा नागपूरसह चंद्रपूरमध्ये तपास करत होती कोरटकर हा दुबईत असल्याचे बोलले जात होते अखेर कोरटकरला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे कोरटकरला शेजारील तेलंगणा राज्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देतानाच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती. पण, तो मी नव्हेच, माझा आवाज मॉर्फ केला आहे, असे कोरटकरकडून सांगण्यात येत होते. गुन्हा दाखल होतात कोरटकर हा फरार झालेला. चौकशीची वेळ आल्यावर कोरटकरने आपल्या मोबाईलमधील डाटा डिलिट करून तो वकिलांमार्फत पोलिसांकडे जमा केला होता. कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाकडून जामीन मिळाला. परंतु, कोरटकरच्या जामिना विरोधात कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा, उच्च न्यायालयाने कोरटकरचा जामीन फेटाळला होता. तरीही कोरटकर पोलिसांसमोर हजर होत नव्हता. कोल्हापूर पोलिसांनी नागपूरमधील त्याच्या घरी तपासणी केली होती. मात्र, कोरटकरच्या पत्नीकडून तो चंद्रपुरात असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी चंद्रपुरात तपासणी केली असता तो आढळून न आल्याने पत्नीने दिशाभूल केल्याचे बोलले जात होते. त्यातच कोरटकरचा दुबईतील एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे तो दुबईत असल्याचो बोलण्यात येत होते. परंतु, दुबईत सांगण्यात येत असलेला कोरटकर अखेर तेलंगणात सापडला आहे. कोरटकरला तेलंगणातून पोलिसांनी अटक केल्याचे समोर आले आहे.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या