🌟कृषीमंत्री कोकाटे शिक्षाप्रकरणी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंसह विरोधक आक्रमक....!


🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक आक्रमक झाल्याने कृषीमंत्री कोकाटे राजीनामा प्रकरणी घेतली बैठक🌟

✍️ मोहन चौकेकर                                                              

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माणिकराव कोकाटे यांच्यासोबत बैठक पार पडली या बैठकीत माणिकराव कोकाटे यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 1996 च्या एका प्रकरणात कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निकालाविरोधात माणिकराव कोकाटे यांनी वरिष्ठ कोर्टात शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी धाव घेतली आहे. या प्रकरणी कोर्टात 5 मार्चला सुनावणी होणार आहे. पण माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आल्याने सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी आज विधान परिषदेच्या सभागृहात केली. विधीमंडळाचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं. यावेळी विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली. विरोधकांनी गदारोळ घातल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. कोर्टाची ऑर्डर आल्यावर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेऊ, असं देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सांगितले.

💫विरोधी अंबादास दानवे माणिकराव कोकाटे राजीनामा प्रकरणी आक्रमक :-

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झालेली आहे. या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती देण्यात आलेली नाही. दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे. मग सरकारची या प्रकरणात भूमिका काय आहे?", असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी संबंधित सदस्य हे विधानसभेचे आहेत. तो विषय त्या सभागृहात येईल. दोन्ही सभागृहांचा मंत्री असतो. पण ते विधानसभेचे सदस्य असल्याकारणाने तिथे हा विषय येईल असं सभापती राम शिंदे म्हणाले.

💫मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजीनामे प्रकरणी आश्वासन :-

विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहता अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिका मांडावी लागली. "मी विरोधी पक्षनेत्यांना एवढंच सांगू इच्छितो की, आपण मंत्री महोदयांबद्दल जे म्हणत आहात, त्याबाबत कोर्टाने सुनावणी पूर्ण केली आहे आणि निकाल राखून ठेवला आहे. त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्यावर सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील", असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांने दिले आहे.

💫मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री पवार,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माणिकराव कोकाटे सोबत बैठक :-

दरम्यान मंत्री माणिकराव कोकाटे यांची आज तीन प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडल्याची माहिती आहे. माणिकराव कोकाटे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात चारही नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माणिकराव कोकाटे यांनी वेळ येईल तेव्हा मी माझी भूमिका मांडेल, अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना दिली.                                      

✍️ मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या