पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील माखणी येथे खासदार मित्र मंडळातर्फे भव्य क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दि.३१ मार्च २०२५ रोजी शिवसेना उबाठा गटाचे पुर्णा तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सर्कल प्रमुख गजानन शिराळे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख विशाल भोसले,चेअरमन प्रतिनिधी व माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव आवरगंड,अंगद आवरगंड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या स्पर्धेचे पंच म्हणून चांदाजी आवरगंड,प्रल्हाद आवरगंड,नवनाथ आवरगंड यांची नेमणूक केलेली आहे तरी या क्रिकेट स्पर्धेचा पंचक्रोशीतील क्रिकेट प्रेमींनी अवश्य लाभ घ्यावा या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या क्रिकेट संघानी नोंदणीसाठी दिपक आवरगंड,सुनील आवरगंड,धनंजय आवरगंड यांच्याशी संपर्क साधावा क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी करण काळे संदीप आवरगंड आदींनी जय्यत तयारी सुरू केली आहे.....
0 टिप्पण्या