🌟औरंगजेब आगामी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा : औरंगजेबाची कबर म्हणजे पुढची अयोध्या....!

 


🌟वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी केली टिका🌟

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात मागील काही दिवसांपासून मुगल बादशाह औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशामध्ये नागपूरमध्ये घडलेल्या दोन गटात झालेल्या वादाचे रुपांतर जाळपोळ आणि दगडफेकीत झाले. यानंतर नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचे पडसाद हे विधिमंडळातदेखील उमटल्याचे पाहायला मिळाले. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख व माजी खा. प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या होणार आहे, असे त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. नुकतेच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, ते औरंगजेबाला आगामी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा बनवत आहेत. औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावर निवडणूक लढवणार आहेत.

औरंगजेबाची कबर भविष्यातील अयोध्यासारखा मुद्दा होणार आहे. २०२६ मध्ये निवडणूक होणार आहे, असे म्हणत सूचक विधान केले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या या विधानावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. तसेच, नागपूर हिंसाचारानंतर दोन्ही बाजूच्या लोकांवर खोटी अफवा परवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या