🌟भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गणेश गाढे यांची निवड🌟
परभणी (प्रतिनिधी) :- परभणी शहरातील माता आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ व समाजहित अभियान प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतरत्न, परमपूज्य, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र्यावर आधारित खुल्या सामान्य ज्ञान परीक्षा, थंड पिण्याच्या पाण्याची पानपोई, भव्य अन्नदान, रुग्णांना फळे वाटप व इतर सामाजिक उपक्रम राबवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी जनसेवक गणेश वाल्मिक गाढे यांची दिनांक 16 मार्च 2025 रोजी माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी कार्यालय येथे सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्ष पदी शेख सरफराज, अजय शिराळे, आकाश राक्षे यांची तर सचिव युनूस कच्ची, विनोद वाडेकर, प्रकाश अंभोरे, सहसचिव सोनू बनसोडे, अजय नंदपटेल, अब्दुल रहेमान खान पठाण, कोषाध्यक्ष पदी शेख इसाक, संघटक पदी संदीप वायवळ, दिपक बनसोडे, शुभम कोरडे, सिद्धार्थ गायकवाड, शेख कलीम आदींची निवड करण्यात आली आहे.
सल्लागार तथा मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार भगीरथ बद्दर, प्रा. राजकुमार मनवर, जेष्ठ पत्रकार दिलीप बनकर, ऍड. सुभाष अंभोरे दूधगावकर, अनिताताई सरोदे, प्रा. यशवंत मकरंद, सलीम इनामदार, डॉ. सुनिल जाधव, संघपाल अढागळे, भूषण मोरे, सुनिल ढवळे, संभाजी पंचांगे, कैलासभाऊ पतंगे, उषाताई पंचांगे, सुरेखाताई सिद्धार्थ, पत्रकार राहुल धबाले, पत्रकार बाळूभाऊ घिके, पत्रकार बालाजी कांबळे, पत्रकार सय्यद जमील, पत्रकार रियाज कुरेशी, पत्रकार संजय घनसावंत, पत्रकार सुनिल कोकरे, महेंद्र सानके, राजकुमार शर्मा,शाहीर नामदेव लहाडे, संजीव अढागळे, प्रशांत वाटूरे, हास्यसम्राट सिद्धार्थ खिल्लारे तर सदस्य रमाताई घोंगडे, आकाश अंभोरे, रामसिंग अंभोरे, मुन्नीबाई शिरसे, शिवाजी कोकाटे, सरिताताई अंभोरे, वंदनाताई खिल्लारे, सविताताई घोगरे, रेखाताई कांबळे आदी. जयंती उत्सव समितीचे मुख्य समन्वयक संचालक प्रमोद अशोकराव अंभोरे, संचालक आकाश साखरे, संचालक ऍड. सुभाष अंभोरे दुधगावकर यांची निवड केली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गणेश गाढे यांची निवड झाल्या बद्दल तसेच शेख सरफराज, युनूस कच्ची, संदीप वायवळ, शेख इसाक आदींचा आयोजकांच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला आहे......
0 टिप्पण्या