🌟परभणी येथील गणेश नगर येथील महात्मा फुले विद्यालयात भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा.....!


🌟या विज्ञान दिनाच्या दिवशी सर सी,व्ही रामन यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली🌟 


परभणी :
- परभणी येथील गणेश नगर परिसरातील महात्मा फुले विद्यालयात आशिया खंडातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्हीं.रामण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी स्कॅट्रिंग ऑफ लाईटअर्थात रामन इफेक्टची घोषणा केली तो ऐतिहासिक दिवस भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो या विज्ञान दिनाच्या दिवशी सर सी,व्ही रामन यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली देण्यात आली शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी आपापले प्रयोग सादर केले.


यामध्ये मानसी रायबोले आरसीन शेख,संजीवनी,मयूर जाधव,एहतेशाम शेख,करण डिघोळे,नवनाथ समिंद्रे, महेविश शेख,अक्षदा गरुड,सिद्धी खंदारे, नंदनी खैरणाथ राजेंद्र वाकोडे,तेजस सूर्यवंशी,आवेश शेख , ओवेस शेख,गरुड , रामेश्वर वाळवंटे  जमदाडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व आपले प्रयोग सादर केले वर्ग नववी चा गरुड या विद्यार्थ्याने स्वयंचलित फिल्टर पाणी मशीन बनवले, इतर सर्व विद्यार्थ्यांनीवैशिष्ट्यपूर्ण असे प्रयोग सादर केले, सहभागी विद्यार्थ्यांना व उपस्थित विद्यार्थ्यांना शाखेचे पर्यवेक्षक रमेशराव नाईकवाडे यांनी  वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा व विज्ञानाचे नव नवीन प्रयोग करावेत  आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा असे मार्गदर्शन केले व सहभागी विद्यार्थ्यांना पेन देऊन सन्मानित करण्यात आले, श्री एन के चापके , श्री श्रीकांत नाईकवाडे, आकाशदीप लंगोटे एस,एफ  तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री प्रदीप चव्हाण श्री शिवाजीराव वीरसे श्री राजेंद्र गहाळ श्री अमोल क्षीरसागर  श्री डी जी रांनगिरे श्री मंचकराव जुक्कटे श्री सुजित राठोड  सौ वर्षा पारवे सौ समृद्धी मस्के  यांनी योगदान दिले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या