🌟परभणी व हिंगोली जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 7 हजार 567 प्रकरणे निकाली....!


🌟न्यायालयातील 900 प्रलंबित प्रकरणे निकाली निघालेली असून यात 12 कोटी 47 लाखांची रक्कम वसूली करण्यात आली🌟

परभणी (दि.25 मार्च 2025) : परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने दि.22 मार्च, 2025 रोजी परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम 1889, बँक वसूली प्रकरणे, मोटार अपघातांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे, बीज प्रकरणे (चोरीची प्रकरणे वगळून) व पाणी आकार प्रकरणे, वेतन व भत्त्यांची सेवा विषयक प्रकरणे, महसूल प्रकरणे आणि दिवाणी स्वरूपांची इतर प्रकरणे तसेच बँकेचे वसुली वादपुर्व दाखल प्रकरणे ठेवण्यात आले होते. सदर राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र 7 हजार 567 प्रकरणे निकाली निघालेली असून त्यामधून 19 कोटी 39 लाखांपेक्षा जास्त रक्कमेची वसुली करण्यात आली आहे.

न्यायालयातील 900 प्रलंबित प्रकरणे निकाली निघालेली असून यात 12 कोटी 47 लाखांची रक्कम वसूली करण्यात आली. स्पेशल ड्राईव्ह (कलम 256 व 258 फौ.प्र.सं.) (कलम 279 व 281 भारतीय न्याय संहिता) यामध्ये 1 हजार 85 प्रकरणे निकाली निघाली आहेत. तर वाद दाखल पूर्व इतर प्रकरणे 5 हजार 582 प्रकरणे निकाली निघालेली असून त्याअंतर्गत 6 कोटी 91 लाखांपेक्षा जास्त रक्कमेची वसूली झालेली आहे. 

आयोजित राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्याकरिता अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला म. नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी व हिंगोली जिल्हा अंतर्गत कार्यरत सर्व न्यायाधीश व जिल्हा वकील संघ अध्यक्ष अॅड. एम. एस. सोळंके आणि सर्व वकील संघ यांनी महत्वाची भुमिका पार पाडली. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव अर्चना एम. तामणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे......

*-*-*-*-*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या