🌟परभणी व मानवत तालुक्यातील ‘त्या’ 54 गावांना सिंचन सुविधा उपलब्ध करून द्या....!


🌟पुणे येथील माजलगाव कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार राजेश विटेकर यांची मागणी🌟 

परभणी : परभणी जिल्ह्यातील परभणी व मानवत तालुक्यातील 54 गावे पिण्याचे पाणी व सिंचन सुविधांपासून वंचित असल्याने या गावांना सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी केली.

              उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पुणे येथे माजलगाव कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी पाथरी विधानसभा मतदार संघातील सिंचानाच्या विविध मुद्यांबाबत आमदार राजेश विटेकर यांनी मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. जायकवाडी प्रकल्प टप्पा-2 अंतर्गत माजलगांव धरणाचे, माजलगाव उजवा कालवा द्वारे किमी 50 ते 101 मधील वितरण व्यवस्था (लहान कालव्यांचे) लघु कालव्यांचे अस्तरीकरण झालेले नसल्याने शेवट पर्यंत पाणी पोहचत नाही त्यामुळे पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही, करिता माजलगाव उजवा कालवा किमी 50 ते 101 मधील वितरण व्यवस्था (लहान कालव्यांचे) लघु कालव्यांचे अस्तरीकरण कामे हाती घ्यावे,  पैठण डाव्या कालवा पाथरी मतदार संघातून जातो सदरील कालवा खूप जुना असल्याने शेवटपर्यंत पाणी जात नाही, प्रामुख्याने आपल्या मतदार संघातील शेतकर्‍यांची पिके याच कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे मुख्य कालव्याची व वितरण व्यवस्थेची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी आमदार विटेकर यांनी केली.

             जिल्ह्यातील परभणी व मानवत तालुक्यातील 54 गावे पिण्याचे पाणी व सिंचन सुविधा पासून वंचित असल्याने या गावांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. मुख्य अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास छ. संभाजीनगर यांनी पाणी उपलब्धतेबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. यावरून कार्यकारी अभियंता माजलगाव कालवा विभाग 10 परभणी यांनी पाणी उपलब्धतेबाबत सकारात्मक अहवाल सादर केला आहे. त्यामुळे सदरील प्रस्ताव मंजूर करून आगामी अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करावी, अशी अपेक्षा विटेकर यांनी व्यक्त केली.

            जलसंपदा विभाग अंतर्गत 75 अपूर्ण व 155 पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी दोन टप्प्यांमध्ये कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. जयकवाडी प्रकल्प हा 50 वर्षे जुना प्रकल्प असून याची वितरण प्रणाली ही अतिशय हालाकीच्या स्थितीमध्ये आहे. तेव्हा जायकवाडी प्रकल्प व त्यावरील वितरण प्रणालीची दुरुस्ती व सुधारणा करण्याचे काम हे प्राधान्याने पहिल्या टप्प्यात घेऊन मराठवाड्यातील शेतकर्‍यांना उपकृत करावे.तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघातील कोथळा (ता. मानवत) व कुंभारी (ता. परभणी) येथील बॅरेजेसच्या कामांचे सर्वेक्षण होऊन अंदाजपत्रके तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तेव्हा सदरील कामांना प्रशासकीय मान्यता देऊन मुख्यमंत्री 100 दिवस कार्यक्रमांतर्गत याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी आमदार विटेकर यांनी बैठकीत केली. दरम्यान, यावेळी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या