🌟परभणी येथे संविधान शिल्प नव्याने बसविण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणा चा 3 रा दिवस सुरू......!


🌟या मागणीसाठी ५ मार्च पासून कचरू दादा गोडबोले यांनी उपोषण स्थळी आमरण उपोषण सुरू केले आहे🌟

परभणी_(प्रतिनिधी) दिनांक ६ मार्च गुरुवार शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर संविधान शिल्प बसविण्यास जिल्हा प्रशासन टाळाटाळ करत असल्यामुळे संविधान शिल्प (प्रतिकृती) तात्काळ बसविण्याच्या मागणीसाठी ५ मार्च पासून कचरू दादा गोडबोले यांनी उपोषण स्थळी आमरण उपोषण सुरू केले आहे. 

 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर असलेल्या स्टँड वरील संविधान शिल्पाची  १० डिसेंबर २०२४ रोजी एका समाजकंटकांने तोडफोड करून विटंबना केली होती या ठिकाणी संवीधान शिल्प पूर्ववत बसविण्यात यावे. यासाठी दोन वेळेस जिल्हा प्रशासनाकडे विनंती अर्ज करण्यात आले आहेत. एक महिना उलटून गेला तरीही जिल्हा प्रशासनाने  कुठलीही कार्यवाही केली. नाही. याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येत असून नाईलाजास्तव आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे दिनांक ५ मार्च रोजी सायंकाळ ५.००  वाजल्या पासून कचरू दादा गोडबोले यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे . जोपर्यंत संविधान शिल्प बसविण्यात येत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले यावेळी संजय बगाटे,सुनील कोकरे, लखन सौदरमल आदींची उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या