🌟नांदेड सचखंड गुरुदरा बोर्ड कायद्यातील कलम ११ चे संशोधन तात्काळ रद्द करण्यात यावे.....!


🌟सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या माजी सदस्यांसह शिवसेना माजी शहरप्रमुखांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे🌟

श्री हजुर साहेब नांदेड :- श्री हजुर साहेब नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्ड कायदा १९५६ मधील कलम ११ चे तत्कालीन महाराष्ट्र शासनाने केलेले संशोधन तात्काळ रद्द करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य स.गुरमीत सिघ महाजन,स.मनप्रीतसिंघ कुंजीवाले,स.भगिदरसिघ घडीसाज यांच्यासह शिवसेना नेते मा.शहरप्रमुख स.अवतारसिंघ पहरेदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की सन २०१५ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र शासनाने शिख धर्माच्या पवित्र पाच तख्तांपैकी एक पवित्र तख्त असलेल्या श्री हजुर साहेब नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्ड कायदा १९५६ च्या कलम ११ मध्ये संशोधन करून अध्यक्षाची थेट निवड करण्याचे अधिकार शासनाने स्वताकडे ठेवले आहे हे नांदेड येथील शिख समाजावर अन्याय करणारे  कलम ११ मध्ये संशोधन करून तत्कालीन आमदार स्व.तारासिंघ आणि भूपेंद्रसिंघ मिन्हास या दोन्ही सदस्याची तत्कालीन शासनाने अध्यक्ष म्हणून सचखंड गुरुद्वारा बोर्डवर निवड केली होती.

नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या  तीन सदस्याचे निवडणूक ही संपूर्ण मराठवाडासह. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात ही निवडणूक होत असते. जवळपास ६०० किलोमीटर लांबीच्या हा मतदार संघ आहे गुरुद्वारा बोर्ड निवडणुकीचा खर्च हा नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने करण्यात येतो. गुरुद्वारा बोर्ड निवडणूक हा लवकरात लवकर घेण्यात यावे सदरील निवेदनात असाही उल्लेख केला गेला आहे की दिनांक १७ एप्रिल २०१५ रोजी शासनाने स्थानिक सिख समाजास  विश्वासात न घेता बेकायदेशीर व लोकशाहीस घातक असा १९५६ च्या नियम चे कलम ०६ व कलम १२ मध्ये केलेले  घातक संशोधन रद्द करून स्थानिक शिक्षक समाजास न्याय द्यावा.

 अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड दौऱ्यावर आले होते व नांदेड गुरुद्वारा दर्शनासाठी ते आले असता त्यांना हे निवेदन देण्यात आले आहे सदरील निवेदन देताना सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य स.गुरमीतसिंघ महाजन,स.मनप्रीतसिंघ कुंजीवाले,स.भगिदरसिघ घडीसाज यांच्यासह शिवसेना नेते स.अवतार सिंघ पहरेदार. स.महेंद्रसिंघ लांगरी,स.गुरुप्रीतसिंघ सोखी व गुरुद्वारा बोर्डाचे अधिकारी देखील उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या