🌟आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची व धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी🌟
✍️ मोहन चौकेकर
चिखली : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी व माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे या मागणीसह सरपंच संतोष देशमुख यांच्या अतिशय क्रुरपणे झालेल्या हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या चिखली बंदला व्यापाऱ्यांनी स्वयंपुर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शहरातील व्यापार पेठ दिवसभर कडकडीत बंद राहिली. चिखली बंदला सर्व व्यापारी संघटना, अडत संघटना, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आदींनी पाठींबा दिला होता .
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी व यास जबाबदार माजी मंत्री धनंजय मुंडे यांना खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करावे या मागणीसह संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज चिखली शहर बंद पुकारण्यात आला होता. यास व्यापाऱ्यांनी स्वयंपुर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळ पासूनच व्यापार पेठ कडकडीत बंद ठेवत बंद मध्ये सहभाग घेतला.
सकाळी १० वाजता सकल मराठा समाज बांधवांनी शहरातील विविध भागातून निषेध मोर्चा काढून सरपंच संतोष देशमुख अमर रहे, आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी व खुनाच्या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावे. अशा घोषणा देत तहसीलदार संतोष काकडे यांच्या कडे निवेदन सादर केले. यावेळी सकल मराठा समाज बांधव व सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी , कार्यकर्ते , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या