🌟मस्साजोग ग्रामस्थांनी कालपासून सात मागण्यांसाठी सुरु केलेल्या आंदोलनातील एक मागणी आज शासनाने केली मान्य🌟
बिड :- संपूर्ण राज्यात गाजलेल्या बिड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात राज्य शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून ॲड.उज्वल निकम यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासावर असमाधान व्यक्त करीत देशमुख कुटुंबियांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य शासनाने याप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांच्यासह विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्या नेमणुकीचे आदेश पारीत केले आहेत. ग्रामस्थांनी कालपासून सात मागण्यांसाठी सुरु केलेल्या आंदोलनातील एक मागणी आज शासनाने मान्य केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येला अडीच महिन्याहूनचा कालावधी लोटला आहे. अद्यापही यातील एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलीसांच्या हाती लागलेला नाही. ग्रामस्थ व देशमुख कुटुंबियांनी पोलीस तपासावरच संशय व्यक्त करीत सात मागण्यांसाठी काल दि.२५ फेब्रुवारी पासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्यशासनातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स माध्यमावर याबाबतची माहिती दिली.....
मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे मस्साजोगच्या ग्रामस्थांसह अन्न त्याग आंदोलनाला बसले आहे. आजचा त्यांचा आंदोलनाचा दुसरा दिववस आहे. या आंदोलनाद्वारे ग्रामस्थांनी केजचे तत्कालीन पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन, सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करुन सहआरोपी करावे, फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करावी, सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांना नियुक्त करावे, सदरील प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी रमेश घुले, दिलीप गित्ते, गोरख,दत्ता बिक्कड यांना सहआरोपी करावे आरोपींना फरार होण्यास मदत करणारे डॉ.संभाजी वायबसे दांपत्य, बालाजी तांदळे,संजय केदारसह इतरांची चौकशी करुन त्यांच्या फोनचे सीडीआर ताब्यात घेवून त्यांना सहआरोपी करावे. हत्यानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णालया ऐवजी कळंबकडे कोणाच्या सांगण्यावरुन नेण्यात येत होता याची चौकशी करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.....
-
0 टिप्पण्या