🌟या भिषण अपघातात सामाजिक कार्यकर्ते सय्यद अली यांचा मुलगा सय्यद खाजा सय्यद अली वय २४ वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यु 🌟
पुर्णा :- परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावरील धानोरा भोगाव पाटी लगत आज शनिवार दि.१५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ०५.०० वाजेच्या सुमारास स्विफ्ट कार व ऊसाच्या ट्रॅक्टरचा भिषण अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात पुर्णा शहरातील इकबाल नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सय्यद अली यांचा मुलगा सय्यद खाजा सय्यद अली वय २४ वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.
या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की शहरातील इकबाल नगर परिसरातील युवक सय्यद खाजा सय्यद अली हे पुर्णा येथून काल शुक्रवार दि.१४ फेब्रुवारी २०२५ रोजी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे रुग्णालयात असलेल्या आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते आज शनिवारी सकाळी पहाटेची नमाज पठण करून खाजा हे वसमत झिरोफाटा रस्त्याने आपल्या स्विफ्ट कार क्रमांक एम.एच.१४/एफ.सी./२२७५ या चारचाकी गाडीने पुर्णेकडे येत असताना पहाटे ०५.०० पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर काळाने घाला घातला त्यांची चारचाकी आरळ ते हयातनगर फाटा दरम्यानच्या धानोरा (भोगाव) पाटीजवळ आली असता. रस्त्यावर उभ्या असलेल्या एम.एच. २२/६४२७ क्रमांकाच्या ऊसाच्या ट्रॅक्टरला त्यांच्या कारची जोरदार धडक बसल्याने जोरदार आवाज झाला यावेळी आवाजाने परिसरातील शेतकरी तसेच रस्त्यावरील वाहनधारकांनी गर्दी केली होती यावेळी परिसरातील प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे दिवस उजडण्यापूर्वी असलेल्या काळोखात समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर उजेडामुळे ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला कोणत्याही प्रकारची रिफ्लेक्टर नसल्याने त्यांना रस्त्यावर उभ्या असलेल्या अंदाज आला नसल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगितले परिसरातील ग्रामस्थ शेतकऱ्यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक पोलिस प्रशासनाला अपघाताची माहिती देत त्यांच्यावर उपचार करण्याहेतुने त्यांना जवळील रुग्णालयात हलविले परंतु अपघातात गंभीर जखमी झालेल्या सय्यद खाजा यांचा मृत्यू झाला होता या दुर्दैवी घटनेची माहिती पुर्णा शहरात पसरताच परिसरात मित्र वर्गात हळहळ व्यक्त होत होती मयत सय्यद खाजा यांच्या पार्थिवावर आज शनिवारी रात्री ०९.०० वाजण्याच्या सुमारास पुर्णेतील मुस्लिम स्मशानभूमीत अंतिम संस्कार (दफनविधी) करण्यात आला असल्याचे समजते त्यांच्या पश्चात पत्नी,आई-वडील,तीन काका-काकू,४ भाऊ,१ बहीण-भावजी असा मोठा परिवार आहे.....
0 टिप्पण्या