🌟डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानव मुक्तीचा जो लढा पुकारला होता त्या लढ्याला रमाईची समर्थ साथ🌟
लेखक : श्रीकांत हिवाळे सर
जगाच्या इतिहासामध्ये अनेक तेजस्वी स्त्री रत्न होऊन गेले ज्यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर देय दीपमान इतिहास घडविला परंतु या देशामधील नव्हे जगामध्ये फक्त आणि फक्त माता रमाई भिमराव आंबेडकर यांना उपेक्षित शोषित पीडित वंचित गाव कुसा बाहेर राहणाऱ्या निसर्गाने दिलेले न्याय नैसर्गिक हक्क प्रस्थापित समाज व्यवस्थेने नाकारणाऱ्या कोट्यावधी जनतेची महामाता होण्याचे भाग्य रमाई भिमराव आंबेडकर यांना लाभलं. युगायुगापासून या देशामध्ये असाही समाज होता ज्याच्या स्पर्शाने प्रस्थापित समाज जो स्वतःला उच्चवर्णीय समजायचा तो विंटाळायचा कुत्र्या मांजराला किंमत होती परंतु चार पायाच्या जनावरापेक्षाही अतिशय हीन आणि दिन वागणूक अस्पृश्य समाजाला मिळायची.
अशा उपेक्षीत महार जातीमध्ये रमाईचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ बंदरा नजीक एक छोटसं गाव वनंद गाव या ठिकाणी 7 फेब्रुवारी 1898 रोजी झाला. त्यांच्या आई-वडिलांचे नाव रुक्मिणी व भिकू धुत्रे परिस्थितीने गरीब परंतु कमालीची सदाचारी कष्टाळू असलेलं हे दांपत्य.आपल्या सु स्वभावांन वनंद गावामध्ये व पंचक्रोशी मध्ये आप्तेष्ट नातेवाईकांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. या दाम्पत्याच्या पोटी तीन मुली आणि एक मुलगा सर्वात मोठी मुलगी हीच लग्न अगदी बाल वयातच लावून दिलं. त्या काळामध्ये बालविवाहाची पद्धत होती ती तिच्या संसारी सुखी होती. आता रमा,गौरी आणि सर्वात लहान शंकर भिकू व रुक्मिणी या दाम्पत्याचा आपल्या मुला मुलींवर खूप जीव होता. आपल्या बहिण भावंडा रमा मोठी होती. आई रुक्मिणी हिचा रमावर खूप जीव होता.
लाडाने सारखी रामी रामी म्हणून हाक मारत असे. आई रुक्मिणी ह्यांनी आपल्या मुला मुलीवर चारित्र्य नीतिमत्ता सदाचाराचे धडे देत असताना त्या सांगत वडीलधाऱ्या माणसाचा मान सन्मान ठेवावा कोणासोबतही भांडण करू नये स्वतःला नेहमी करता विधायक कामात गुंतवून ठेवाव कुणाचीही चुगली करू नये नीट नीट करावं घरांमध्ये स्वच्छ असावी.आईने दिलेलं बाळकडू याचा उपयोग रमाई यांना भावी जीवनामध्ये झाला आई-वडिलांचे प्रेम त्यांना जास्त मिळू शकलं नाही. प्रथम आई रुक्मिणी यांचे निधन व काही वर्षातच वडील भिकू धुत्रे यांचे निधन आई-वडिलांच्या अकाली जाण्यामुळे रमा आणि तिची भावंडे पोरकी झाली होती.
भिकू धुत्रे यांचे बंधू व रमाई यांचे बंधू गोविंद पुरकर हे कामधंद्याच्या निमित्ताने मुंबईला राहत.हा दुःखद प्रसंग घडल्यानंतर दोघेही वणंदगावला आले त्यांनी ठरवलं या मुला मुलींचा सांभाळ आपणालाच करावा लागणार व ते त्यांना मुंबईला घेऊन गेले. रमाचे काका आणि मामा मुंबई येथील भायखळ्याच्या मार्केट जवळील चाळीत राहत असत. काका काकू मामा मामी यांनी आई-वडिलांच्या प्रेमाची कमतरता भासू दिली नाही धोत्रे काका व गोविंदपुर मामा यांचे विशेष लक्ष या बहिण भाऊंडावर असायचं रमा लहानची मोठी होत होती आता ती नववर्षाची झाली होती. काका आणि मामानी विचार केला आता रामाचं लग्न करावं चांगलं स्थळ शोधण्याचा प्रयत्न करू लागले.
सैन्या मधून सेवानिवृत्त झालेले व मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईत आलेले सुभेदार रामजी आंबेडकर आपल्या मुलासाठी वधू शोधण्याचं काम करत होते त्यांचा मुलगा भीमराव नव्या वर्गात शिकत होता. भीमराव दिसायला राजबिंडा अभ्यासात हुशार अशा मुलांसाठी त्याला साजेशी सुस्वरूप चारित्र्यसंपन्न शीलवान मुलगी ते शोधत होते त्यांना कळाले गोविंद पुरकर यांची भाची धु त्रे यांची पुतनी रमा हिला आई-वडील नाहीत सुभेदार रामजी भायखळा नजदीकच्या चाळीमध्ये ज्या ठिकाणी रमा आपल्या काका मामा सोबत राहत होती त्या ठिकाणी गेले.रमाला पाहता क्षणी सुभेदार रामजी आंबेडकरांनी मनोमन ठरवले ही मुलगी आपल्या मुलासाठी अतिशय योग्य आहे.
या अगोदर त्यांनी एक मुलगी पसंत केली होती परंतु रमाला बघितल्यानंतर त्याने निश्चय केला रमाच योग्य आहे सुभेदार रामजी आंबेडकरांना त्यांनी जी मुलगी पसंत केली होती त्या मुलीचे आई-वडील तत्कालीन पंच कमिटीकडे गेले पंच कमिटीने रामजी आंबेडकरांना विचारले तुम्ही मुलगी पसंत केली होती आता का नकार देत आहात त्यावेळी त्यांनी उत्तर दिले आपल्या मुलीला मी कोणत्याही प्रकारचा दूषण अथवा नाव बोट ठेवत नाही परंतु रमा ही अनाथ आहे. तिच्याविषयी माझ्या मनामध्ये अनुकंपा निर्माण झाली आपण मला जो दंड द्याल तो मी भरायला तयार आहे. त्या ठिकाणी सुभेदारांनी दंड भरला 1908 मध्ये भायखळा मार्केटमध्ये बाजार सुरू होण्याअगोदर भीमराव व रमाईचा विवाह संपन्न झाला.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये पत्नी या नात्याने रमाईचं आगमन या देशातील उपेक्षित शोषित पीडित वंचित आपले न्याय नैसर्गिक हक्क नाकारल्यांसाठी ही एक अलौकिक घटना होती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानव मुक्तीचा जो लढा पुकारला होता त्या लढ्याला रमाईची समर्थ साथ होती.यादम्पत्यांना आपल्या स्वतःच्या संसाराचा कधी विचार केला नाही त्यामुळे देशामधील कोट्यावधी जनतेचे माता-पिता होण्याचा भाग्य या दाम्पत्याला लाभले.रमाई ह्या सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या लाडक्या सून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्या मिराबाई यांच ही रमावर जिवापाड प्रेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय प्रतिकूल परिस्थिती मधून उच्च शिक्षण घेत होते घरामध्ये प्रचंड आर्थिक अडचण परंतु रमाईने खूप कष्ट केले. पैशाची नेहमी करता अडचण त्यामुळे आजारपणात उपचाराअभावी आपले लाडके सुपुत्र सुकन्या रमेश, राजरत्न, इंदू, गमवावे लागले.
परंतु पोटचे गोळे गेले असताना सुद्धा रमाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांची मनस्थिती विचलित होणार नाही याबाबतीत खबरदारी घेतली त्यांच्या समर्थ दमदार साथीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगामधील नामांकित विद्यापीठाच्या एम ए पीएचडी डीएस्सी एल एल डी डिलीट ह्या पदव्या घेऊ शकले या दाम्पत्यांन स्वतःच्या भौतिक सुखाचा कधीही विचार केला नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या प्रिय पत्नी रमा ह्यांच्यावर निरीतीश प्रेम होतं. 1935 मधील रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधील हा संवाद माता रमाई खूप आजारी होत्या त्यांना जाणीव झाली होती आपण या जगाचा निरोप घेणार आहोत या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमालीचे भाऊक झाले होते. आपला बराचसा वेळ ते रमाई जवळ व्यतीत करत एके दिवशी रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात साहेब मला एकदा पंढरपूरला घेऊन जा मला विठोबाचे दर्शन घ्यायचं आहे माझी ती शेवटची इच्छा आहे.
त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाईला आवेश पूर्ण स्वरात म्हणतात 'अग रामू जो विठोबा भक्ताला दूर लोटतो तो का देव म्हणावा आपण अशी पंढरी निर्माण करू तिथे कुणालाही दूर लोटल जाणार नाही' आपल्या प्रिय रामूचे स्वप्न त्या जिवंत असताना पूर्ण होऊ शकली नाही अगदी काही दिवसातच त्यांचे निधन झाले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर मुक्कामी अशोक विजयादशमी दिनी आपल्या पाच लाख अनुयायांना पूज्यवदंत चंद्रमणी महास्थवीर यांच्या हस्ते आपल्या सुविद्य सहचारिनी डॉ सविता उपाख्य माई साहेब स्वतः बुद्ध धम्माचे दीक्षित झाले व नंतर पाच लाख अनुयायांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली.
या पद्धतीने माता रमाईला दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केले दीक्षाभूमी या ठिकाणी सर्व जाती-धर्माचे लोक येत असतात. कोणावरही बंदी नाही माता रमाईच्या असीम त्याग सेवा समर्पणामुळे या देशामधील अस्पृश्य गणलेला समाज तमाम नारी वर्ग यांना त्यांचे न्याय नैसर्गिक हक्क भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून दिले.आज दिनांक सात फेब्रुवारी माता रमाईचा जन्मोत्सव त्यांच्या विचाराला कार्याला विनम्र अभिवादन व माता रमाई जयंती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
लेखक : श्रीकांत हिवाळे सर
माजी तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा जिल्हा परभणी
0 टिप्पण्या