🌟तसेच चीनने गुगलविरोधात 'अँटी-ट्रस्ट' कायद्यांतर्गत चौकशी सुरू करण्याचेही जाहीर केले🌟
संयुक्त राष्ट्रे/बीजिंग/नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, कॅनडा आणि मेक्सिकोमधून येणाऱ्या मालावर कर लादण्याची घोषणा केल्यानंतर कॅनडापाठोपाठ चीननेही अमेरिकेला प्रत्युत्तर देत अमेरिकन मालावर १५ टक्के कर लावण्याचे जाहीर केले आहे. तसेच चीनने गुगलविरोधात 'अँटी-ट्रस्ट' कायद्यांतर्गत चौकशी सुरू करण्याचेही जाहीर केले आहे. चीनचे संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधी फू काँग म्हणाले, "अमेरिकेच्या अवाजवी करवाढीला आमचा कडाडून विरोध असून, हा जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचा भंग आहे.
ट्रम्प यांनी लावलेल्या कराविरोधात चीनने जागतिक व्यापार संघटनेत तक्रार दाखल केली आहे. तसेच, आम्हाला प्रत्युत्तरादाखल कठोर पावले उचलण्यास भाग पाडले जाऊ शकते, असे ते म्हणाले. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केले की, अमेरिकेतील कोळसा आणि द्रव नैसर्गिक वायूवर १५% कर तसेच, कच्चे तेल, कृषी यंत्रणा आणि मोठ्या इंजिनाच्या कारवर १० टक्के कर लावला जाईल......
0 टिप्पण्या