🌟पुर्णा शहरातील कुरेशी मोहल्ला येथून घरासमोरील मोटार सायकल अज्ञात चोरट्यानी पळवली....!


🌟फिर्यादी सय्यद शकील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात पुर्णा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल🌟 

पुर्णा :- पुर्णा शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरातील रहिवासी सय्यद शकील सय्यद जब्बार यांच्या घरासमोर लावलेली त्यांची हिरो कंपनीची फॅशन प्रो मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना आज बुधवार दि.२६ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ०५.०० वाजेच्या सुमारास उघडकीस आली या संदर्भात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुर्णा पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात राहणारे सय्यद शकील सय्यद जब्बार हे नेहमी प्रमाणे कामावरून आल्यानंतर त्यांनी काल मंगळवार दि.२६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ०१.०० वाजेच्या सुमारास आपली हिरो कंपनीची काळ्या रंगाची फॅशन प्रो मोटार सायकल क्रमांक एम.एच-२२ एएच ७२२३ ही दुचाकी गाडी नेहमी प्रमाणे आपल्या घरा समोर लावून ते झोपी गेले आज बुधवार दि.२६ फेब्रुवारी रोजी पहाटे ०५.०० वाजताचे सुमारास वडीलांना मिरखेल स्टेशन येथे सोडण्यासाठी जायचे असल्याने ते उठले यावेळी त्याच्या वडीलांनी घरा बाहेर येवुन पाहिले असता घरा समोर लावलेली त्यांची मोटार सायकल त्यांना दिसली नाही त्यामुळे त्यांनी भावाला उठवुन विचारले की मी घरासमोर लावलेली मोटारसायकल दिसत नाही तु कोणाला दिली का असे विचारले असता त्यांने सांगितले की मी मोटार सायकल कोणालाही दिली नाही त्यानंतर त्यांच्यासह घरातील सर्वांनी सदर मोटार सायकलचा पुर्णा शहरात व इतर ठिकाणी आजुबाजुला शोध घेतला असता मोटारसायकल कुठेही मिळुन आली नाही आपली मोटार सायकल कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आज बुधवार दि.२६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १.०० ते पहाटे ५.०० वाजेच्या दरम्यान चोरून नेली असल्याची खात्री झाल्याने सय्यद शकील सय्यद जब्बार यांनी पुर्णा पोलिस स्थानकात रितसर फिर्याद देऊन गुन्ह्याची नोंद केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या