🌟छ.संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो यांचे मंत्री संजय शिरसाट यांनी केले स्वागत🌟
छत्रपती संभाजीनगर :- अखिल भारतीय भिख्खू महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो यांनी आज रविवार दि.२३ फेब्रुवारी रोजी सामाजिक न्यायमंत्री मा.संजय शिरसाट यांची त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट घेऊन बुद्धगया महाबोधी बुद्ध विहार मुक्ती बुद्धगया येथे महाराष्ट्रातील उपासकांसाठी यात्री निवास निर्माण करण्याबाबत तसेच पूर्णा येथील विपश्यना केंद्र व बुद्ध विहाराच्या विकास कामासाठी निधी मिळवून देण्याच्या कामी चर्चा केली.
त्याप्रसंगी अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो पुर्णा यांचे सामाजिक न्यायमंत्री मा.ना.संजय शिरसाट यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी त्यांच्या सोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता एस.एस.भगत व इंजिनिअर बी.के.आदमने आदींची उपस्थिती होती.....
0 टिप्पण्या