🌟परभणी जिल्हा पोलिस दलातील कर्तव्यतत्पर पोलिस कर्मचारी भगवान वाघमारे यांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती....!


🌟त्यांच्या झालेल्या पदोन्नतीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟

परभणी :- परभणी जिल्हा पोलिस दलात मागील दशकभरापासून सेवा बजावणारे कर्तव्यकठोर कर्तव्यतत्पर कर्मचारी तथा परभणी जिल्हा विशेष शाखा अंतर्गत पुर्णा/चुडावा हद्दीमध्ये गोपनीय शाखेत जवळपास दहा वर्ष सेवा बजावणारे पोलिस अंमलदार भगवान वाघमारे यांनी विभागीय अर्हता परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांची पोलीस उपनिरीक्षक गट 'ब' अराजपत्रित पदावर निवड झाली असून त्यांची बदली राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई येथे पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे प्राप्त आदेशाने झालेली आहे त्यांच्या झालेल्या पदोन्नतीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या