🌟परभणी शहरात शिवसेने (शिंदे) गटाच्या वतीने भव्य मोटार सायकल रॅली संपन्न....!


🌟शिवसेना परभणी महानगर प्रमुख नितेश देशमुख यांच्या वतीने भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन🌟 

परभणी (दि.१९ फेब्रुवारी २०२५) : परभणी शहरात आज बुधवार दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्त शिवसेना (शिंदे) गटाच्या वतीने भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती.

          शिवसेना परभणी महानगर प्रमुख नितेश देशमुख यांच्यावतीने आयोजित केलेल्या या मोटारसायकल रॅलीत शिवसेनेचे नेते आनंद भरोसे,भास्करराव लंगोटे,धम्मदीप रोडे, प्रभाकर कदम,बाळासाहेब पानपट्टे,गीता सूर्यवंशी,कल्पना दळवी, सूवर्णा देशमुख, मालनबाई धोत्रे, वैभव देशमुख, वैभव काकडे, वामन मोरे यांच्यासह अन्य नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रॅलीतील कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या