🌟न्याय,प्रेम आणि शांती यावर केंद्रित जगातील ही सर्वात मोठी शिखर परिषद ठरणार आहे🌟
मुंबई : दुबई येथे जगातील सर्वात मोठ्या जागतिक शिखर परिषदेचे आयोजन एप्रिल महिन्यातील दि.१२ व १३ एप्रिल रोजी ठेवण्यात आले असून न्याय,प्रेम आणि शांती यावर केंद्रित जगातील ही सर्वात मोठी शिखर परिषद ठरणार आहे.
दुबई मध्ये आयोजित या जागतिक शिखर परिषदेत जगभरातील २,८०० हून अधिक शांतीरक्षक सहभाग नोंदवणार आहेत 'एक ग्रह, एक आवाज : जागतिक न्याय,प्रेम आणि शांती' या विषयावर आधारित जागतिक न्याय,प्रेम आणि शांती शिखर परिषद १२-१३ एप्रिल २०२५ रोजी दुबईतील एक्स्पो सिटी येथील दुबई प्रदर्शन केंद्र येथे होणार आहे. 'आय एम पीसकीपर' अभियानामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या या कार्यक्रमात ७२ नामवंत वक्ते आपले विचार मांडतील. त्यात १० नोबेल पुरस्कार विजेते, जागतिक विचारवंत, धोरणकर्ते, उद्योजक, सांस्कृतिक आदर्श मानल्या जाणाऱ्या व्यक्ती, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज आणि शांती आणि न्यायाचे समर्थक यांचा समावेश असेल......
0 टिप्पण्या