💫कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीकडून पुण्यात मंत्री मोहोळांच्या कर्मचार्याला बेदम मारहाण💫
✍️ मोहन चौकेकर
💫मराठी भाषा संतांनी टिकवली, आमचे संत पुरोगामी होते, फुरोगामी लोकं काहीही म्हणू देत, दिल्ली मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष तारा भवळकरांच्या भाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवारांनी दिली दाद, तर मराठीला अभिजात दर्जा दिल्याबद्दल शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार ; ग्यानबा-तुकोबाच्या मराठीला राजधानी दिल्लीत अतिशय मनापासून नमन करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कृतज्ञता
💫समास जोड्या जुळवा ते निबंध,जालन्यातील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर फुटला, थेट झेरॉक्स सेंटरवर प्रिंट; महाराष्ट्राच्या शिक्षण वर्तुळात खळबळ ; इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं बिहारमध्ये कॉपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
💫धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अण्णा हजारे पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे ; धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे आज मस्साजोगमध्ये, म्हणाले, चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची व्यक्त केली शक्यता
💫महायुतीतील कोल्ड वॉर आता विठ्ठलाच्या दारी, विठ्ठल भक्तांना अल्प वेळेत देवाचे दर्शन मिळावे यासाठी मंजूर झालेली प्रकल्प निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रद्द ; मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा; एकनाथ शिंदेंचा शिवसेना ठाकरे गटाला इशारा
💫 भाजपच्या चिखली मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांना जीवे मारण्याची धमकीची तीन पत्रे ; पत्रातून आम्ही बकरे कापणारे , शीर धडापासून वेगळे करण्याची भाषा ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, बुलढाण्यातील जिल्ह्यातील देऊळगावमहीमधून दोघांना अटक
💫कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंमुळे अजितदादांची राष्ट्रवादी बॅकफूटवर, नाशिकच्या पालकमंत्रिपदावर पाणी सोडावं लागण्याची शक्यता ; अजित पवार सोडा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच मुंडे, कोकाटेंचा राजीनामा घ्यावा --संजय राऊत सुरेश धसांचा बुरखा फाटला --- संजय राऊत
💫धुळ्यातील शिरपूरमध्ये प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटनेनं जिल्हा हादरला ; कोयत्याने वार केला अन् प्रेयसीचे शीर धडावेगळं! स्वतःच फोन करुन पोलिसांना बोलावून घेतलं, रक्ताने माखलेल्या कोयत्यासह पोलीस ठाण्यात पोहोचला, दोघेही पुणे जिल्ह्यातील
💫कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीकडून पुण्यात मंत्री मोहोळांच्या कर्मचार्याला बेदम मारहाण प्रकरण, पोलिस उपायुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले, 3 अटकेत 1 फरार, आरोपींमध्ये गजा मारणेच्या भाच्याचाही समावेश ; केंद्रीय मंत्रीमहोदयांची ही अवस्था तर सर्वसामान्य जनतेचे काय? गजा मारणे गँगची मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारहाण, खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
💫'छावा' सिनेमाबाबतच्या वादग्रस्त पोस्टनंतर चारी बाजूंनी टीकेची झोड, अखेर स्वरा भास्करने मौन सोडलं, म्हणाली, आपल्या इतिहासाचा गौरव करणे खूप छान आहे, पण कृपया सध्याच्या चूका लपवण्यासाठी ऐतिहासिक वैभवाचा गैरवापर करू नका ; छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान विकीपीडियाला महागात पडणार, आक्षेपार्ह लिखाणाबद्दल महाराष्ट्र सायबर सेलकडून थेट गुन्हाच दाखल
💫अजिंक्य रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला ; भारताविरुद्धच्या मॅचपूर्वी पाकिस्तानचा पाय खोलात, आयसीसीनं केली मोठी कारवाई, पाकिस्तानच्या टीमला मॅच फीच्या 5 टक्के दंड भरत गोगावलेंना पालकमंत्रिपद द्यायचं की नाही, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह निर्णय घेणार, नाशिकचा पालकमंत्री पदाचा तिढाही सोडवणार.......
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या