🌟गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नियमबाह्य नियमित वेतन सुरू❓


🌟राहुल जिगळेकर यांच्या तक्रारीवरून चार सदस्यीय चौकशी समिती चौकशीचे आदेश जारी🌟                  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖                 

 नांदेड (दि.१५ फेब्रुवारी २०२५) :- नियमबाह्य कामासाठी प्रसिद्ध असलेल्या आरोग्य विभागाच्या पदोन्नती प्रक्रिययेतील अनियमितता, राजगडाच्या पदभाराचे तिन वेळा आदेश काढणे ,सुमुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मानधनाच्या रकमेत ठेकेदारांची बांधकाम देयके अदा करुन समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सात महिने मानधन न देणे,या प्रकरणानंतर आरोग्य विभागाचा नवा कारणामा उघडकीस आला असून हा नियमबाह्य प्रतिनियुक्तीच्या इतिहासातील सर्वोच्च कारणामा आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की,लोहा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र माळाकोळी येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ कवळे हे जवळपास सात वर्षांपासून माळाकोळीकडे फिरकलेच नाहीत.ते प्रतिनियुक्तीवर हदगाव तालुक्यात कार्यरत असल्याचे समजते.परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी व उपसंचालक यांना अत्यावश्यक वेळी फक्त सात दिवसांपर्यंत प्रतिनियुक्तीचे अधिकार असतांना तब्बल सात वर्षांपासून नियमबाह्य प्रतिनियुक्तीवर राहुन नियमितपणे वेतन घेणारे डॉ.कवळे यांच्या प्रतिनियुक्ती प्रकरणी तात्काळ चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल जिगळेकर यांनी केली असता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, माता बालसंगोपन अधिकारी,लोहा तालुका आरोग्य अधिकारी व हदगाव तालुका आरोग्य अधिकारी यांची संयुक्त चौकशी समिती नेमली आहे.या चौकशी समितीला पंधरा दिवसांची मुदत दिलेली असुन वस्तुनिष्ठ व स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे समितीला आदेशीत केले आहे.अहवालानंतर यातील सत्य उघडकीस येईल....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या