🌟आम आदमी पार्टीचे सहसंस्थापक प्रशांत भूषण यांची केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका🌟
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीच्या पराभवाला अरविंद केजरीवाल हेच सर्वस्वी जबाबदार आहेत अशी जोरदार टीका आम आदमी पार्टीचे सहसंस्थापक प्रशांत भूषण यांनी केली प्रशांत भूषण म्हणाले की, केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीला एकाच व्यक्तीचे वर्चस्व असलेला आणि सर्वात भ्रष्टाचारी पक्ष बनविला केजरीवाल यांनी स्वतःसाठी शीशमहाल बांधला आणि ते आलिशान गाड्यातून प्रवास करत असत. प्रस्थापित पक्षांना पर्याय देण्यासाठी 'आप'ची स्थापना करण्यात आली होती. मात्र पक्षाची 'आप'च्या पराभवाला केजरीवालच जबाबदार.
कार्यपद्धती पारदर्शक, जबाबदार आणि लोकशाहीवर आधारित न ठेवता केजरीवाल यांनी पक्षाला स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवले. त्यांनी पक्षाला अपारदर्शक आणि भ्रष्ट स्वरुपात रूपांतरित केले. ज्यांनी लोकपालची मागणी केली होती, त्यांनीच लोकपाल काढून टाकला, असे भूषण म्हणाले.केजरीवाल यांनी स्वतःसाठी ४५ कोटींचा शीशमहाल बांधला. 'आप'ने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समित्यांचे ३३ तपशीलवार अहवाल त्यांनी रद्द केले. वेळ आली की, पक्ष सोयीस्कर धोरण स्वीकारेल. त्यांना वाटते की, केवळ प्रचार आणि भाषणबाजीने राजकारण करता येते. ही 'आप'च्या शेवटाची सुरुवात आहे, असे त्यांनी सांगितले.....
0 टिप्पण्या