🌟केंद्र सरकार वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लवकरच टोलची नवी योजना सुरू करणार.....!


🌟टोल धारकांना सुट देणार केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे संकेत🌟

संपूर्ण भारतातील राष्ट्रीय महामार्गावरील व टोल नाक्यावरील वाढती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लवकरच टोलची नवी योजना सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.

सरकारच्या योजनेतून लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रदूषण आणि वाहतूकीची समस्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अनेक योजना सुरु केल्या जाणार आहेत. त्यासाठी त्यांच्या रस्ते व वाहतूक मंत्रालयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

नव्या योजनेमुळे टोल समाप्त होणार का? या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी सस्पेंस कायम ठेवला. या योजनेची घोषणा लवकरच केली जाईल असे त्यांनी सांगितले. सरकार उपग्रहावर आधारित टोल पद्धतीवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतही निर्णय होणार आहे. पण, हा निर्णय या योजनेपासून वेगळा आहे. आगामी काळात टोल देणा-यांची नाराजी दूर केली जाईल, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.......

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या