🌟सकल मातंग समाज्याच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात आंदोलन करत न्याय देण्यात यावा अशी मागणी🌟
परभणी :- परभणी शहरामध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेत एका दहा वर्षीय मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केला तिला मारहाण केली अशा दोन्ही गुन्हेगारांना अटक करून फाशीची शिक्षा करावी त्यासाठी योग्य ती कारवाई करावी. तसेच मुलीला व मुलीच्या कुटुंबांना सुरक्षा द्यावी तिचा योग्य पद्धतीने उपचार करावा व आरोपींवर फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकल मातंग समाज्याच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात आंदोलन करत न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
तसेच ही परिस्थिती कुठल्याही समाजातील महिला व बालिकांवर येऊ नये यासाठी येणाऱ्या काळात पोलीस प्रशासनाकडून कडक कार्यवाही व्हावी व अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी परभणी शहरातील चालू असलेले शैक्षणिक संकुल बाजारपेठ व ट्युशन या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची गस्ती घालण्यासाठी त्यांना आदेश काढावे व महिला व बालिका यांना आपण परभणी जिल्ह्यात सुरक्षित वावरू शकतो व फिरू शकतो याची जाणीव करून द्यावी व येणाऱ्या काळामध्ये अशा नराधमाला जागीच ठेसण्याचा अधिकारही नागरिकांना द्यावा अशीही मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे......
0 टिप्पण्या