🌟असे मत माजी सरपंच किरणताई धर्मे यांनी १० वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमावेळी बोलतांना व्यक्त केले🌟
पाथरी :- शाळेत झालेले संस्कार व मिळालेली ज्ञानाची शिदोरी विद्यार्थ्यांनी कायम सोबत ठेवली पाहिजे आपले ध्येय निश्चित करून त्याला गाठण्यासाठी वाट्टेल ते परिश्रम केले पाहिजेत यश हमखास नक्की मिळेते असे प्रकतिपादन लोणी बु च्या माजी सरपंच किरणताई धर्मे यांनी १० वी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमा वेळी बोलतांना व्यक्त केले.
गुंज येथील प.पू.चिंतामणी महाराज माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्याच्या निरोप समारंभ कार्यक्रम सोमवार १७ फेब्रुवारी रोजी शाळेच्या मैदानात पार पडला या वेळी त्या बोलत होत्या.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक डी. एन.गिरी तर प्रमुख पाहुणे म्हणून लोणीच्या माजी सरपंच सौ.किरण ताई धर्मे , माजलगाव येथील गोविंद गोचडे, प्रमुख उपस्थिती मध्ये गजानन धर्मे हे होते.
यावेळी गोविंद गोचडे यांनी विनोदी शैलीतून मुलांना आनेक किस्से सांगून व कविता सादर करून मार्गदर्शक केले. यावेळी रविंद्र धर्मे,गजानन धर्मे,संतोष देशमुख यांनी आपले मनोगत व्यात केले मुख्याध्यापक डी. एन.गिरी यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी प्रास्ताविक विनायक कदम यांनी केले तर दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.के.वीरकर यांनी केले. आभार प्रदर्शन धनश्री जोशी हिने केले कार्यक्रम यशस्वी करण्या साठी जी.व्ही वाघ पाटील. डि.के विरकर, कारेगावकर.आर. एस,कदम व्हि.डि,पवार एच जी दुगाने, बी.ए. धर्मे एल.के.गुंजकर, ए.के. नेमाने एस.टी,धुवारे एस.एम,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.....
0 टिप्पण्या