🌟नांदेड येथील शहिदपुरा गोळीबार प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने आणखी दोन संशयित आरोपी घेतले ताब्यात....!


🌟आरोपींना एटीएस पथकाने न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली🌟

नांदेड (दि.१९ फेब्रुवारी २०२५) :- नांदेड शहरातील गुरुद्वारा गेट क्रमांक सहा परिसरातील शहीदपूरा भागात दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी हत्या प्रकरणातील जन्मठेपेची सजा झालेला व पॅरोलवर सुटलेल्या गुरमितसिंघ सेवादार व त्याच्या मित्रावर झालेल्या गोळीबाराच्या घटने प्रकरणी दहशतवादी विरोधी पथकाने आणखी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून अटक केलेल्या सर्व आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.

सन २०१६ यावर्षी सरदार सत्येंद्रसिंघ संधू यांच्या झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणात गुरमितसिंघ राजासिंघ सेवादार यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती गुरमितसिंघ हा काही दिवसांपूर्वी तुरुंगातून पॅरोल रजेवर सुटला होता दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी गुरमितसिंघ सेवादार व त्याचा मित्र रविंद्रसिंघ राठोड हे दोघेजण गुरुद्वारा गेट क्रमांक सहा समोरील शहीदपूरा भागातून जात असतांना त्यांच्यावर दुचाकीवर आलेल्या एका अज्ञात इसमाने गोळीबार केला या गोळीबारात रविंद्रसिंघ राठोड हा शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मरण पावला तर गुरमितसिंघ सेवादार हा गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी वजिराबाद पोलिस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे गुन्ह्याचे गांभिर्य बघुन हा गुन्हा दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) कडे वर्ग करण्यात आला आहे गोळीबार करणारा आरोपी हा टॉपचा शुटर असून तो परप्रांतीय असल्याचे समजते त्याला मदत केल्या प्रकरणी पोलीसांनी मनप्रीतसिंघ उर्फ मन्नू गुरबक्षसिंघ ढिल्लो (वय ३१) आणि हरप्रितसिंघ उर्फ हॅप्पील बाबुसिंघ कारपेंटर या दोघांना अटक केली त्यानंतर दहशतवादी विरोधी पथकाने पंजाब येथुन अर्शदिपसिंघ भजनसिंघ (वय २८) यास अटक केली त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने नांदेड येथे दलजितसिंघ करमसिंघ संधू (वय ४१) आणि हरजितसिंघ उर्फ राजू अमरजितसिंघ गिल (वय ३१) या दोघांना अटक केली. दोन्ही आरोपींना एटीएस पथकाने न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गोळीबाराच्या घटनेत आरोपीला मदत केल्या प्रकरणी पोलीसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या