🌟 या वर्धापन दिन सोहळ्याच्या धार्मिक उत्सवात अनेक गावांतील भजनी मंडळींनी सहभाग नोंदवला🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील कनकेश्वर महादेव मंदिराचा पाचवा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी सकाळी १०.०० ते १२.०० या सुमारास हभप.संतराम महाराज ढोणे पांगरेकर यांचे हरिकीर्तन सोहळा व नंतर १२.०० ते ०३.०० हभप.माऊली महाराज मुडेकर यांचे किर्तन सेवा करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी बाहेर गावाहून आलेले भजनी मंडळी मौजे फळा,मौजे पांगरा ढोणे,मौजे ममदापूर,मौजे कानेगाव यांचेही या ठिकाणी उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे आयोजन समस्त गावकरी मंडळी कान्हेगाव यांनी केले व नंतर तीन ते आगमनापर्यंत महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले. प्रसंगी हरिकीर्तनचा व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या महाप्रसादाचे अन्नदाते कान्हेगाव नगरीचे सरपंच प्रकाशराव लक्ष्मणराव बोकारे व सौ.रुक्मिणीबाई प्रकाशराव बोकारे यांच्याकडून करण्यात आले.......
0 टिप्पण्या