🌟जगाला चीनपासून पुन्हा धोक्याचा संदेश ? चीन मध्ये आढळला आता कोरोनाचा नवा विषाणू.....!


🌟चीनच्या संशोधकांनी वटवाघळांमधील नवीन कोरोना विषाणू व्हायरस शोधला🌟

बीजिंग : जगाला चीनपासून पुन्हा धोक्याचा संदेश मिळत असून चीनच्या संशोधकांनी वटवाघळांमधील नवीन कोरोना विषाणू व्हायरस शोधून काढल्याने जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. चीनच्या वुहान येथून पाच वर्षांपूर्वी कोरोना व्हायरस संपूर्ण जगात पसरला होता.

त्यानंतर संपूर्ण जगाला धडकी भरली होती आता विषाणूतज्ज्ञ शी झेंगली यांच्या नेतृत्वाखालील चिनी संशोधकांच्या पथकाने वटवाघळांमधील हा नवीन कोरोना विषाणू शोधला आहे. या नवीन विषाणूचे नाव एचकेयू ५-सीओव्ही-२ असे असून हा विषाणू मर्बेकोव्हायरस सबजीनसशी संबंधित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या