🌟तेलंगणा पोलिस व धर्माबाद पोलिसांनी संयुक्तरित्या धाड टाकुन तब्बल ३५० किंटल सरकारी तांदळाचा अवैध साठा केला जप्त🌟
नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील गरीब नवाज ट्रेडर्स या दुकानावर तेलंगणा राज्य पोलीस व धर्माबाद पोलिसांनी संयुक्तरित्या धाड टाकुन तब्बल ३५० किंटल सरकारी तांदळाचा अवैध साठा जप्त केला आहे याप्रकरणी व्यापारी शेख अजीम शेख रहीम यास पोलीसांनी अटक केली आहे.
तेलंगणातील शासनाच्या विविध योजनेतील तांदुळ काळ्या बाजारात विक्री केला जात होता. याप्रकरणी म्हैसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार व तेलंगणातील निर्मलच्या पोलीस अधीक्षका डॉ. जानकी शर्मीला यांच्या मार्गदर्शनाखाली एएसपी अबिनाशकुमार, एएसपी राजेश मिना यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी धर्माबाद येथे आज दाखल झाले. त्यांनी पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते व पोलीस निरिक्षक बाळासाहेब रोकडे यांच्याशी चर्चा करुन धर्माबाद शहरातील छत्रपती चौकात असलेल्या नवाज ट्रेडर्स या दुकानावर धाड टाकली. दुकानात साडेतीनशे किंटल तांदळाचा साठा आढळून आला. तांदुळ खरेदीबाबत कोणतेही बील व कागदपत्रे आढळून आले नाही. पोलीसांनी व्यापारी शेख अजीम शेख रहीम यास अटक केली आहे......
0 टिप्पण्या