🌟परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं बाळाशास्त्री जांभेकर यांची जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न🌟
✍️मोहन चौकेकर
परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं बाळाशास्त्री जांभेकर यांची जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम शहरातील अतिथी हॉटेल या ठिकाणी आयोजित करण्यात आला. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवलिंग बोधने, डॉ. सुनील तुरुकमाने, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभु दिपके, हल्ला विरोधी कृती समितीचे रामेश्वर शिंदे, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, राजकुमार हटेकर, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. सुरेश नाईकवाडे म्हणाले की पत्रकारिता ही आधुनिक झाली आहे. आणि आव्हानही तेवढेच वाढले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या समर्थनात आपण जेव्हा लिखाण करतो तेव्हा आपल्याला वाहवा करत समर्थन करतात. परंतु एखाद्या वेळी आपण एखाद्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर ताशेरे ओढत असताना त्यांचे मन दुखते. परंतु आपण आपले कर्तव्य पार पडले पाहिजे. कोणाला खुश करण्यासाठी किंवा कोणाच्या विरोधात आकस भावनेने पत्रकारिता करु नये असेही ते म्हणाले. यावेळी अनिल दाभाडकर ,विठ्ठल वडकुते , सुधाकर श्रीखंडे, मोईन खान, प्रशांत खंदारे, भूषण मोरे, संजय बगाटे, शिवशंकर सोनुने, राहुल वहिवाळ, बालाजी कांबळे, नजीब सिद्दिकी, बाळू घिके, सय्यद जमील, सय्यद खिजर, हरीभाउ सुतारे, संजय घनसावंत, राहुल पुंडगे, शेख आजर, शेख इस्माईल, सदाशिव राऊत, आदी मोठ्या प्रमाणावर पत्रकारांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वहिवाळ यांनी केले तर आभार सुधाकर श्रीखंडे यांनी मानले......
0 टिप्पण्या