🌟विरोधी खासदारांनी या विषयावर चर्चेची मागणी केल्यानंतर राज्यसभेत प्रचंड गोंधळाचे वातावरण : कामकाज तहकूब🌟
नवी दिल्ली :- उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात संगम घाटावर मौनी अमावस्येच्या दिवशी शाही स्नानाच्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा अधिकृत जाहीर करावा अशी मागणी आज सोमवार दि.०३ फेब्रुवारी रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी लावून धरत सरकारला धारेवर धरले राज्यसभेत देखील या घटनेचे तीव्र पडसाद उमटले विरोधी पक्षाच्या खासदारांनी या विषयावर चर्चेची मागणी केल्यानंतर राज्यसभेत प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीचे कामकाज सुरुहोताच दोन्ही सभागृहात प्रयागराज येथील चेंगराचेंगरीच्या घटनेवरुन विरोधकांनी चर्चेची मागणी लावून धरली. मागच्या आठवड्यात बुधवार दि.२९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या शाही स्नानासाठी २८ तारखेपासूनच प्रयागराज येथे भाविक मोठ्या संख्येने जमा झाले होते. प्रयागराज येथे संगम घाटावर शाही स्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक जात असतांना घाटावरील बुरीकेटस तुटल्याने गोंधळ उडाला होता. या गोंधळातच भाविक सैरावैरा धाऊ लागले. त्यातच चेंगराचेंगरी झाल्यामुळे काही जणांना आपले प्राण गमवावे लागले. अनेक जण या घटनेत गंभीर जखमी झाले. उत्तरप्रदेश प्रशासनाने तात्काळ मदत व बचावकार्य सुरु केले होते. याची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेवून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी ते सातत्याने संपर्कात होते. प्रशासनाच्यावतीने या घटनेत ३० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी करीत आहेत. या घटनेचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. सभागृहाचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी उत्तरप्रदेश सरकारने या घटनेतील मृतांची माहिती उघड करावी अशी मागणी लावून धरली.
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे आज दि.०३ फेब्रुवारी रोजी या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. मात्र,आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरु होताच सभागृहात गदारोळ झाला. यामध्ये राज्यसभेच्या सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबाबत चर्चेची मागणी केली. मात्र, विरोधी खासदारांची ही मागणी मान्य न केल्यामुळे खासदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच उत्तर प्रदेश सरकार या घटनेतील मृतांची माहिती उघड का करत नाही ? असे सवाल विरोधकांनी विचारले. या मुद्यावरून राज्यसभेत खासदारांनी तात्काळ चर्चा करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. यानंतर राज्यसभेचे सभापती असलेले जगदीप धनखड यांनी चर्चा सदस्यांनी सभागृह सुरळीत चालू द्यावे अशी विनंती केली. पण तरीही विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. प्रमोद तिवारी आणि दिग्विजय सिंग (काँग्रेस), सागरिका घोष (टीएमसी), जावेद अली आणि रामजी लाल सुमन (समाजवादी पक्ष), आणि जॉन ब्रिटास (सीपीआय) यांनी महाकुंभ प्रकरणावर चर्चेची मागणी करणाऱ्यासंदर्भात पत्र दिलं आहे. मात्र, महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत सकाळच्या सत्रात चर्चा नाकाल्यानंतर काँग्रेस, सपा, द्रमुक, आप, आरजेडी, सीपीआय आणि सीपीएम या विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार निदर्शने केली. राज्यसभेत विरोधी खासदारांनी महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या मुद्यावरून उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सभात्याग केला......
0 टिप्पण्या