🌟दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल-संजय सिंह यांच्या विरोधात कारवाई...!


🌟दिल्ली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करणार कायदेशीर कारवाई🌟

नवी दिल्ली : दिल्ली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग 'आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल व संजय सिंह यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. 

दिल्ली एसीबीकडून पाठवण्यात आलेल्या नोटिसीला त्यांनी उत्तर न दिल्याने हे पाऊल उचलण्यात येणार आहे.आपच्या नेत्यांनी कोणतेही उत्तर न दिल्यास एसीबी दिल्ली पोलिसांना पत्र लिहून या नेत्यांविरोधात कायदेशीर कारवाईची शिफारस करणार आहे. दिल्ली निवडणूक निकालापूर्वी एक दिवस आधी केजरीवाल यांनी दावा केला की, भाजप त्यांच्या उमेदवारांना फोन करून १५-१५ कोटी रुपयांची ऑफर देत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या