🌟अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार🌟
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका व फ्रान्स देशाच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल सोमवार दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी फ्रान्समध्ये दाखल झाले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ चर्चा करतील.
करण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच बैठक असेल. ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी अनेक देशांविरुद्ध आक्रमक व्यापारयुद्ध सुरू केल्याने ते भारतासंबंधी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर मोदींचा अमेरिका दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. यापूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी जून २०१७ मध्ये अमेरिकेचा दौरा केला होता तर, फेब्रुवारी २०२० मध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे भारत भेटीला आले होते.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स येथे जात आहेत. फ्रान्समध्ये १० ते १२ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या 'एआय ॲक्शन समिट' मध्ये ते सहभागी होतील. यानंतर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मार्सिएले येथे पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले जाणार आहे......
0 टिप्पण्या