🌟राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या केले जोरदार स्वागत🌟
परभणी (दि.२८ फेब्रुवारी २०२५) : परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील युवा नेते अक्षय देशमुख यांच्यासह महानगर पालिकेच्या १५ माजी नगरसेवकांनी आज शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी परभणीत आयोजित केलेल्या एका जाहीर कार्यक्रमाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या जाहीर सभेसह पक्षप्रवेश सोहळ्यास माजीमंत्री नवाब मलिक,आमदार विक्रम काळे,आमदार राजू नवघरे, जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेश विटेकर, महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, माजी विरोधी पक्षनेते विजय जामकर, अक्षय देशमुख यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
युवा नेते अक्षय देशमुख, माजी महापालिका सदस्य जाकेर लाला, नागेश सोनपसारे, विकास लंगोटे, वसीम कबाडी, आकाश लहाणे, अखिल काझी, शेख अहमद, कलीम अन्सारी, अलि खान, मेमन, माजी नगराध्यक्षा श्रीमती जयश्री खोबे यांच्यासह अन्य तीघांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह अन्य नेतेमंडळींनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी युवा नेते देशमुख यांनी आपल्या भाषणातून महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिले पाच वर्षे प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत उत्तम पध्दतीने काम झाले. परंतु, पुढील पाच वर्षात ज्येष्ठ नेत्यांच्या दबावतंत्राच्या वापरामुळे, मनमानीमुळे विकास कामे ठप्प झाली. त्याचा परिणाम शहरवासीयांना भोगावा लागला. माजी सदस्यांनासुध्दा रोषास सामोरे जावे लागले, असे नमूद केले.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी, निवडणूकांना यशस्वीपणे सामोरे जा, झेंडा फडकवा, सरकारद्वारे सर्वतोपरि मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली. कोणाचाही दबाव येवू देणार नाही, असे स्पष्ट करतेवेळी पवार यांनी परभणी महानगरांतर्गत भूमीगत गटार योजना पूर्णतः रखडली आहे. आजच आपण वरिष्ठ अधिकार्यांबरोबर चर्चा करीत या योजनेंतर्गत अडथळे दूर करण्या संदर्भात मुंबईत स्वतंत्र बैठक घेवू व योजना मार्गी लावू, महानगरांतर्गत रस्त्यांची अवस्था निश्चितच बिकट आहे, रस्ते कामाकरीता निधी दिला जाईल, तसेच समांतर पाणी पुरवठा योजनाही मार्गी लावू, अशी ग्वाही पवार यांनी दिली.....
0 टिप्पण्या