🌟अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे लक्ष आता भ्रष्ट नौकरशाहांकडे ?


🌟 मुंबईतील भाईंदर येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी ईडीचा छापा🌟

मुंबई/भाईदर : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने आता शासकीय पदाचा गैरवापर करून अमाप संपत्ती गोळा केलेल्या भ्रष्ट नौकरशाहांकडे आपले लक्ष वळवल्याचे दिसत असून मुंबईतील भाईंदर पूर्वेच्या आरएनपी पार्क येथील कृष्णा सागर सोसायटीमध्ये राहणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी ईडीने छापा टाकला आहे. 

दिल्ली येथील सक्त वसुली अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या अधिकाऱ्यांनी भाईंदर पूर्वेच्या आरएनपी पार्क येथील कृष्णा सागर सोसायटीमध्ये राहणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप सिंह यांच्या घरी छापा टाकला आहे. ही कारवाई नक्की कशामुळे केली, याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या