🌟पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची निवड....!

 


🌟दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमध्ये अनेक नावे चर्चेत आहेत🌟


नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत बहुमत मिळवल्यानंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष दिल्लीतील सरकार स्थापनेकडे लागले असून दिल्लीचा  मुख्यमंत्री कोण होणार ? याबाबतच्या चर्चाना जोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर जाऊन आल्यानंतर म्हणजे १३ फेब्रुवारीनंतर दिल्लीतील भाजपचा मुख्यमंत्री ठरणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमध्ये अनेक नावे चर्चेत आहेत.

भाजप नेत्यांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेवरून परतल्यानंतर भाजप सरकार स्थापनेचा दावा करू शकते. भाजपमध्ये दिल्लीचा मुख्यमंत्री निश्चित करण्याबाबत विचारविमर्ष सुरू झाला आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी याबाबत चर्चा केली. तर दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलवली आहे.

🌟दिल्लीचे नायब राज्यपालांकडे वेळ मागितली :-

दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी नायब राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर सचदेवा म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्षाचे नेतृत्व घेईल. सर्व निवडून आलेले आमदार हे त्यांची जबाबदारी पार पाडायला सक्षम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या