💫महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.......!


💫बुलढाणा केसगळती प्रकरणी संशयाची सुई शासकीय स्वस्त धान्य दुकानातून पुरवल्या जाण्याऱ्या धान्याकडे ?💫

💫आमच्या दोन पिढ्या संपल्या, मस्साजोगला 19 पुरस्कार, देशमुख कुटुंबीयांना पाठिंबा देणाऱ्यांना जातीयवादी ठरवू नये, भगवानगडावर पुराव्यांसह नामदेवशास्त्रींची भेट घेणाऱ्या देशमुख कुटुंबाची आर्त साद ; तुम्हीही आमच्या गडाचेच,आरोपीच्या पाठीशी गड कधीही राहणार नाही,नामदेवशास्त्रींची धनंजय देशमुखांना ग्वाही

💫धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक,मनोज जरांगेंचा आरोप,धनंजय मुंडेंनीच भगवान गडच्या महंताना बोलायला लावल्याचाही आरोप 

 💫ते शरद पवार अन् अजित पवारांनाही एकत्र आणतील, संजय शिरसाटांना 'महान' म्हणत संजय राऊतांचा खोचक टोला ; माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येणार नाहीत, संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर खासदार नारायण राणेंची प्रतिक्रिया,तर संजय शिरसाटांनी संजय राऊत होऊ नये, नितेश राणेंचा सल्ला ; यापुढे मला काळजी घ्यावी लागेल,मंत्री नितेश राणेंच्या सल्ल्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया 

💫फलटणच्या रामराजे निंबाळकरांचे चुलतभाऊ संजीवराजे आणि मुलगा अनिकेत पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, विधानसभेच्या तोंडावर धरला होता शरद पवारांचा हात 

💫एकनाथ शिंदे यांच्याबरोबर माझे शीतयुद्ध नाही, मात्र मी मा‍झ्या भूमिकेवर ठाम, ठाण्यातील जनता दरबार संदर्भात मंत्री गणेश नाईकांची प्रतिक्रिया  

💫पूजा खेडकरचे पाय आणखी खोलात, आई आणि वडिलांच्या नावावर असलेल्या संपत्तीची माहिती मागवली, नगर जिल्हा प्रशासनाचे नोंदणी महानिरीक्षकांना पत्र 

💫त्र्यंबकेश्वरहून द्वारकेला निघालेली बस 200 फूट दरीत कोसळली, नाशिक-सुरत महामार्गावरील सापुतारा घाटात झालेल्या अपघातात मध्य प्रदेशातील 7 जणांचा जागीच मृत्यू, 15 जण गंभीर जखमी 

💫बुलढाणा केसगळतीप्रकरणी संशयाची सुई रेशन दुकानातून पुरवल्या जाण्याऱ्या धान्याकडे, रेशनला धान्य पुरवणाऱ्या गोडाऊनची केंद्रीय पथकांकडून तपासणी, गोदामातून धान्य पुरवठ्यास मनाई 

💫कधी घरात,कधी फोटो स्टुडिओत,अल्पवयीन बहिणीवर चुलत भावाचा अत्याचार, पीडिता गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस, पुण्यातील घृणास्पद प्रकार 

💫भारतीय महिला संघाने सलग दुसऱ्यांदा अंडर 19 टी 20 वर्ल्डकप जिंकला, दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट राखून दणदणीत विजय ; दक्षिण आफ्रिकेवरील चोकर्सचा शिक्का कायम, चॅम्पियन होण्याचे स्वप्न पुन्हा भंगले, 24 महिन्यांत 4 वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत                         

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या