पुर्णा (दि.१७ फेब्रुवारी २०२५) :- पुर्णा शहरात प्रतिवर्षा प्रमाणे याहीवर्षी देखील शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक छञपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त धार्मिक/सामाजिक/सांस्कृतिक अश्या भरगच्च विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन शहरातील शिवभक्तांकडून शिव जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
पुर्णा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शहरातील महादेव मंदिर संस्थान येथे मंगळवार दि.१८ फेब्रुवारी रोजी रात्री ०९.०० ते ११.०० वाजेपर्यंत शिवचरित्रकार हभप. सुरेश महाराज नाईकवाडे पुणे यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे तर त्याच दिवशी रात्री १२.०० वाजेच्या सुमारास शिवजन्मोत्सव पाळणा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर बुधवार दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत पुर्णा शहरातून शिवप्रतिमेची पारंपारिक पद्धतीने भव्य शिवजन्मोत्सव मिरवणूक काढण्यात येणार असून या शिवजन्मोत्सव मिरवणुकीला शहरातील महादेव मंदिर संस्थान या ठिकाणाहून सुरुवात होणार असून या शिवजन्मोत्सव मिरवणुकीचे मुख्य आकर्षक लिमला व ताडकळस येथील लेझीम पथक तसेच नांदेड येथील जगदंबा ढोल ताशा व ध्वज पथक हे राहणार असून शहरी व ग्रामीण भागातील भजनी मंडळी यांचे भजन गायन देखील या मिरवणुकीत राहणार आहेत
या मिरवणुकीत हत्ती व घोड्यांसह आकर्षक अश्वरथाची देखील सजावट राहणार आहे शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शिवतीर्थावरील अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्यास आकर्षक अशी रोषणाई व सजावट करण्यात आल्याने व शहरात सर्वच भगवे ध्वज भगव्या पताका लावण्यात आल्याने संपूर्ण शहरात भगवेमय वातावरण निर्माण झाले आहे या जन्मोत्सवात शहरातील व ग्रामीण भागातील सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान शिवजयंती जन्मोत्सव समिती पूर्णा च्या वतीने करण्यात आले आहे......
0 टिप्पण्या