🌟परतूर विधानसभेचे माजी आमदार सुरेश जेथलीया यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना ते म्हणाले🌟
मुंबई :- राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यावर आठवडाभरात पैसे टाकले जातील अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज शनिवार दि.१५ फेब्रुवारी २०२५ रोजी केली जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश जेथलीया यांचा आज शनिवार दि.१५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहिण योजना बंद होणार असल्याच्या बातम्या येत आहेत लाडकी बहिण योजनेवरुन आमच्यावर टीका होत असली तरी ही योजना बंद होणार नाही असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका कार्यक्रमात दिले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लाडकी बहिण योजनवरुन आमच्यावर टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असे सांगतिले जात आहे. पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचं त्यांनी सांगितले. राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी पीक विमा योजनेबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, एक रुपयात पिक विमा दिला मात्र त्यात मोठे गैरप्रकार होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. गायरान जमीन शासकीय जमीन यावर पिक विमा काढण्यात आला आहे. आम्ही बेरजेचे राजकारण करतोय. हा शिव शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तीच परंपरा आपल्याला टिकवायची आहे. जातीय सलोखा टिकला पाहिजे यासाठी आपण काम केले पाहिजे अशी सुचना त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिली. आम्ही यापुढे स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिकार देणार आहोत. जो सामाजिक बांधिलकी जपून काम करतोय अशा होतकरु तरुणांना जिल्हा परिषद नगर परिषदेत संधी द्या असे अजित पवार म्हणाले. महायुती मध्ये समन्वयक नेमले आहेत. आम्ही सर्वांना सांगितले आहे महामंडळ कुणाला कोणते हवेत ते घ्या अन सर्वांना संधी द्या. आपला महाराष्ट्र साधू संतांची भूमी असल्याचे अजित पवार म्हणाले. आज काय आपण बघतोय, टीव्ही लावला की हा आमका असा म्हणाला तो तसा म्हणवा. आरोप प्रत्यारोप करुन सामन्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असेही अजित पवार म्हणाले. ब्रेकिंग न्यूज दाखवली जातायेत. सूत्र सूत्र अरे कुठे आहेत सूत्र. सर्वांना सांगतो या बातम्यावर विश्वास ठेवू नका असेही अजित पवार म्हणाले. माझा राजकारणात १९९१ साली प्रवास सुरू झाला. मराठवाडा विदर्भ खानदेश राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या अभ्यास आम्हाला करायला भेटल्याचे अजित पवार म्हणाले. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जाणतो असंही अजित पवार म्हणाले......
0 टिप्पण्या