🌟तर पिक स्पर्धेतही कृषी विभगागाने १८ जणांना केले सन्मानीत🌟
परभणी (दि.१८ फेब्रुवारी २०२५)- संजीवनी कृषी महोत्सवामध्ये भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या गृहउपयोगी वस्तूच्या स्टॉलला प्रथम क्रमांक देऊन कृषी विभागाने सन्मानित केले. यावेळी २४० स्टॉल पैकी २१ स्टॉलला सन्मानीत केले तर पिक स्पर्धेतही कृषी विभगागाने १८ जणांना सन्मानीत केले आहे.
संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात या मान्यवरांच्या हस्ते संचालक शिक्षण तथा आधिष्ठाता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, डॉ. भगवान आसेवार, आत्माचे प्रकल्प संचालक व जिल्हा कृषी अधिकारी दौलत चौहाण, अध्यक्ष उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे, प्रकल्प उपसंचालक अभिषेक घोडके, परभणी तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे, पाथरी तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे, सोनपेठच्या तालुका कृषी अधिकारी प्रियंका कावरे, जिंतूर तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण शिंदे, तंत्र अधिकारी प्रिया नवणे, जैविक प्रयोगशाळा अधिकारी शिवनेरी चव्हाण यांची उपस्थिती होती. ५ दिवसाच्या कार्यक्रमात बी.एस. गाडवे, डॉ. गजनन गछदे, डॉ. पुरुषोत्तम वायाळ, डॉ. आनंद गोरे, डॉ.डी.डी. पटाईत, डॉ. अमीत तुपे, हर्षल जैन, डॉ.आर.डी. क्षिरसागर आदींनी शेतकNयांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आबासाहेब देशमुख यांनी तर आभार मंडळ कृषी अधिकारी वैâलास गायकवाड यांनी केले. कृषी विभागाचे व संजीवनी मित्र मंडळाचे भाजीपाला उत्पादक ग्रुप च्या वतीने खूप खूप धन्यवाद यामध्ये भाजीपाला उत्पादक ग्रुपचे सदस्य पंडितराव थोरात जनार्धन आवरगंड विजय जंगले प्रकाश हरकळ रामेश्वर साबळे आधी शेतकNयांचा समावेश होता. यशस्वीतेसाठी कृषी विभागाच्या आत्माच्या स्वाती घोडके, प्रशांत ढोके, रजनीकांत देशमुख, सुरेश काळे, प्रमोद रेंगे, जी.डब्ल्यू. रणेर, रवी माने, धु्रपती विखे, विश्वांभर मोकासे, गणेश तिडके, गोपाळ खटींग, रमेश इक्कर आदींनी परिश्रम घेतले.......
0 टिप्पण्या