🌟केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणेला अटक....!


🌟कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह त्याच्या टोळीविरोधात मोकोका कायद्यांतर्गत कारवाई🌟

पुणे : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे कार्यकर्ते आयटी अभियंते देवेंद्र जोग यांना १९ फेब्रुवारी २०२५ रोजी गंभीर स्वरूपाची मारहाण करण्यात आली होती या मारहाण प्रकरणी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह त्याच्या टोळीविरोधात मोकोकान्वये कारवाई करण्यात आली आहे गजा मारणे याच्यासह अन्य तीन गुंडांनाही अटक करण्यात आली असून चौथा आरोपी फरार आहे.

आयटी अभियंते देवेंद्र जोग यांना मारहाण झाल्या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी मारणे टोळीतील तीन गुंडांना अटक केली आहे. ओम तीर्थराम,किरण कोंडिबा पडवळ आणि अमोल विनायक तापकीर तिघे राहणार शास्त्रीनगर कोथरूड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चौथा आरोपी श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार हा पसार झाला आहे. त्यांच्याविरोधात यापूर्वी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

या मारहाणीवेळी स्वतः गजा मारणे जरी घटनास्थळी नसला तरी टोळीचा म्होरक्या म्हणून म्हणून तो रडारवर आला. मारहाण प्रकरणात मारणे यालाही आरोपी करण्यात आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली असून, आरोपींसह या गुन्ह्यासंदर्भात ७४ घरांची झडती घेतली आहे. मोबाइल ट्रॅकिंग, सीसीटीव्ही कॅमेरे यांच्याद्वारेदेखील तपास सुरू असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

💫देवेंद्र जोग यांना गाडीचा धक्का लागल्यावरून करण्यात आली मारहाण :-

देवेंद्र जोग हे आयटी अभियंता असून भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांना मारहाण झाल्यावर कोथरूड पोलिसांनी सुरुवातीला मारहाणीची कलमे दाखल केली होती. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यावर त्यामध्ये आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले. जोग हे १९ फेब्रुवारी रोजी घरी जाताना रस्त्यावर गर्दी असल्याने ते बाजूला थांबले होते. त्यावेळी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून चौघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी, पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली. त्याबाबत त्यांनी वडिलांसोबत कोथरूड पोलीस ठाण्यात जात फिर्याद नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींच्या मुसक्या आवळल्या...,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या