🌟बिदर जिल्ह्यातल्या उपळा येथील भालकी तालुक्यातील सन्नती येथे बुद्ध विहार लोकार्पण सोहळा संपन्न....!


🌟यावेळी अखिल भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी व लक्षवेधक संख्येने उपासक उपासिकांची उपस्थिती होती🌟


बिदर : बिदर जिल्ह्यातल्या उपळा येथील भालकी तालुक्यातील सन्नती बुद्ध विहारात काल शनिवार दि.२२ फेब्रुवारी २०२५ रोजी पु.भिक्खु धम्मबोधी यांच्या संयोजना खाली सन्नती बुद्ध विहार लोकार्पण कार्यक्रम अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या हस्ते व पु. भिक्खु संघाच्या उपस्थितीत बुद्ध मूर्ती स्थापनेचा व पु.भिक्खु संघाच्या धम्म प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.


 या प्रसंगी पु. भिक्खु पय्यानंद थेरो यांनी आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांना सातकर्णी स्मरणीका भेट दिली या क्षणी पु.भिक्खु महाविरो थेरो, पु.ज्ञानसागर थेरो, पु.भिक्खु नागसेन बोधी व पूजनीय भिक्खु संघ तथा बिदरचे खासदार मा.सागर खंडरे साहेब,उदय सोनवणे, मिलिंद धावारे,समता सैनिक दल,अखिल भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी व लक्षवेधक संख्येने उपासक उपासिकांची उपस्थिती होती.......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या