🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.......!


🌟शिवसेना राख साचलेल्या निखाऱ्यासारखी झालीय फुंकर मारायची गरज - राजन साळवी

💫आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात गुप्तभेट, दोनवेळा भेट झाल्याची माहिती, आधी खासगी रुग्णालयात, मग मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसोबत तिघांची एकत्र साडे चार तास चर्चा   ; मी गुप्त नव्हे तर उघड भेटलो, प्रकृतीची चौकशी करण्यासाठी धनंजय मुंडेंची भेट, ; सुरेश धस यांचा खुलासा ; मी, धनंजय मुंडे आणि सुरेश धस साडेचार तास एकत्र होतो, त्यांच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाहीत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे वक्तव्य 

💫 संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या कथित बी टीममधल्या चौघांची नावं धनंजय देशमुखांनी केली जाहीर,बालाजी तांदळे, संजय केदार,डॉक्टर वायबसे, मोराळे अजून मोकाट असल्याचा आरोप ; दोषी नाही तर कारवाई नाही, देवगिरीवरच्या बैठकीनंतर अजित पवारांकडून मंत्री धनंजय मुंडेंना पुन्हा अभय 

💫 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शह देत असल्याची चर्चा, मुख्यमंत्री वॉररुमच्या धर्तीवर एकनाथ शिंदेंकडून को-ऑर्डिनेशन रुमची स्थापना, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचीही स्थापना ; पालकमंत्रिपदाचा वाद कायम असताना एकनाथ शिंदेंचा नाशिक दौरा, मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही घेणार कुंभमेळ्याचा आढावा, पण  गिरीश महाजन राहणार गैरहजर 

💫हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयांत पीक विमा दिला, कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे वक्तव्य, विमाकंपन्यांच्या कारभाराकडे बोट  

💫शिवसेना राख साचलेल्या निखाऱ्यासारखी झालीय, फुंकर मारायची गरज; राजन साळवींच्या सोडचिठ्ठीनंतर भास्कर जाधवांचे वक्तव्य 

💫 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जेएनयूपेक्षाही जास्त डावे, जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडीत यांचे वक्तव्य, क्रांतिकारकांचा आपण सन्मान राखला पाहिजे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांना पोर्ट ब्लेअरला पाठवा, शांतिश्री पंडित यांचा टोला 

💫भरधाव वाहन काळ बनून आलं, अपघातात अकोल्यातील मूर्तिजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तुकाराम बिरकडांचा मृत्यू  ; कारवरील नियंत्रण सुटलं, भरधाव कारचा अपघात, वर्ध्यात 3 तरुणांचा दुदैवी अंत, तर एक गंभीर जखमी 

💫 पेटंट्स, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क्सचे राष्ट्रीय मुख्यालय मुंबईहून दिल्लीला हलवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल 

💫 मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयकडून निर्बंध, ठेवीदारांना ठेवी काढण्यास मनाई  ; न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे संचालक मंडळ 12 महिन्यांसाठी बरखास्त, आरबीआयचा दणका 

💫 नरेंद्र मोदी- डोनाल्ड ट्रम्प यांची द्विपक्षीय चर्चा, आण्विक ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणार, तहव्वूर राणाला लवकरच अमेरिका भारताकडे सोपवणार, एफ 35 लढाऊ विमान भारताला सोपवण्यास अमेरिका राजी  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या