🌟मंगरुळपीर येथील श्री.मिञ मंडळाकडुन रक्तदान शिबीर संपन्न....!


🌟या रक्तदान शिबीरात 35 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग🌟


✍️फुलचंद भगत

मंगरूळपीर :- ग्रामदैवत संत श्री बिरबलनाथ महाराज, श्री संत गजानन महाराज प्रगट दिन व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित श्री. डॉ हेडगेवार रक्तपेढी,अकोला यांच्या संयोजनाने श्री संत गजानन महाराज मंदिर हुडको कॉलनी मंगरूळपीर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.यामध्ये 35 रक्तदात्यांनी  रक्तदान करून  देश सेवेमध्ये आपला सहभाग नोंदविला. 

                 श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त असे रक्तदान शिबिर श्री मित्र मंडळ दरवर्षी आयोजित करतात. हे त्याचे 8 वे आयोजन होते.या शिबिराचे आयोजन श्री मित्र मंडळ मंगरूळपीर यांचे सदस्य सर्वश्री पवन सारडा ,शिरीष बियाणी, गुणवंत पिंपळकर,रमण शर्मा, रोहित भुतडा, सचिन बुरे, प्रफुल अहिरकर,  मुन्ना भाऊ लोहिया ,संजु राठी व इतर सदस्यांनी केले होते. यामध्ये लोकप्रिय आमदार श्याम खोडे यांचे सुपुत्र सुरज  खोडे , गणेश लुंगे,  गोपाल वर्मा यांची उपस्थिती होती तसेच गिरडेकर, शेळके, देवा राठोड, शेंद्रे व मंदिर कमिटीचे इतर सदस्यांचे सहकार्य लाभले.सदर रक्तदान शिबीरामध्ये महिलांनीही ऊत्फुर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.यामध्ये अॅड राखी संजय जाखोटीया व सखी मंचच्या गीता नरेश बजाज यांचा विषेश सहभाग होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या